New Zealand National Cricket Team vs Sri Lanka National Cricket Team, ODI Series 2025: न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ (NZ vs SL) यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील (ODI Series) पहिला सामना 05 जानेवारी (रविवार) रोजी वेलिंग्टन येथील बेसिन रिझर्व्ह येथे खेळवला जात आहे. न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात खेळल्या जात असलेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, या सामन्यात श्रीलंकेच्या संघाचा डाव 43.4 षटकात 178 धावांवर संपुष्टात आला. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करत श्रीलंकेच्या फलंदाजांना सतत दडपणाखाली ठेवले.
An easy chase coming up for the hosts?https://t.co/jhDxCuofTa #NZvSL pic.twitter.com/97y7NkX8iK
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) January 5, 2025
श्रीलंकेची सुरुवात खूपच खराब झाली. चौथ्याच षटकात पॅथुम निसांका (9 धावा) मॅट हेन्रीच्या चेंडूवर मिचेल सँटनरकडे झेलबाद झाला. यानंतर कुसल मेंडिस (2 धावा) जेकब डफीच्या गोलंदाजीवर बाद झाला. अवघ्या 23 धावांवर संघाने चार विकेट गमावल्या होत्या. (हे देखील वाचा: New Zealand vs Sri Lanka, ODI Stats: पाहा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये न्यूझीलंड आणि श्रीलंका यांची एकमेकांविरुद्धची कामगिरी)
अविष्का फर्नांडोने 56 धावांची अर्धशतकी खेळी खेळून संघाला काही प्रमाणात सावरले, पण ग्लेन फिलिप्सने त्याचा झेल घेतला. त्याच्याशिवाय जेनिथ लियानागेने 36 धावा केल्या, तर वानिंदू हसरंगाने 35 धावांची धडाकेबाज खेळी केली. या दोघांशिवाय एकही फलंदाज क्रीझवर टिकू शकला नाही.
न्यूझीलंडच्या गोलंदाजांमध्ये मॅट हेन्रीने प्राणघातक गोलंदाजी करत 10 षटकांत 19 धावांत 4 बळी घेतले. जेकब डफी आणि नॅथन स्मिथने प्रत्येकी 2 बळी घेतले, तर मिचेल सँटनरनेही यश मिळवले. श्रीलंकेच्या डावात अविष्का फर्नांडोने सर्वाधिक धावा केल्या, पण संघ 178 धावांपर्यंतच मर्यादित राहिला. आता या लक्ष्याचा पाठलाग न्यूझीलंड कसा करतो हे पाहायचे आहे.