New Zealand National Cricket Team vs Sri Lanka National Cricket Team, ODI Series 2025: न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील (ODI Series) पहिला सामना उद्या, 5 जानेवारी रोजी होणार आहे. उभय संघांमधील हा सामना वेलिंग्टन (Wellington) येथील बेसिन रिझर्व्ह (Basin Reserve) येथे भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता खेळवला जाईल. याआधी न्यूझीलंडने टी-२० मालिका 2-1 ने जिंकली होती. आता पहिला एकदिवसीय सामना जिंकून मालिकेत आघाडी घेण्याचे किवी संघाचे लक्ष्य असेल. दुसरीकडे, श्रीलंकेचा संघ टी-20 मालिकेतील दारुण पराभव विसरून सामना जिंकू इच्छितो. दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे. या मालिकेत न्यूझीलंडची कमान मिचेल सँटनरच्या (Mitchell Santner) खांद्यावर आहे. तर, श्रीलंकेचे नेतृत्व चरित असालंका (Charit Asalanka) करत आहे. (हेही वाचा - NZ vs SL 1st ODI 2025 Preview: न्यूझीलंड आणि श्रीलंकेत रंगणार पहिला एकदिवसीय सामना, जाणून घ्या कूठे पाहू शकता लाईव्ह मॅच)
नुकतीच श्रीलंकेविरुद्ध टी-20 मालिका जिंकल्यानंतर न्यूझीलंडला वनडे मालिकेत आपला वेग कायम ठेवायचा आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये न्यूझीलंड संघाची अलीकडची कामगिरी सरासरी असली तरी घरच्या मैदानावर त्यांची कामगिरी नेहमीच दमदार असते.
दुसरीकडे, श्रीलंकेने नुकत्याच झालेल्या तीन एकदिवसीय मालिकेत चांगली कामगिरी केली आहे, परंतु श्रीलंकेची खरी कसोटी न्यूझीलंडच्या वेगळ्या वातावरणात असेल. श्रीलंकेच्या संघात काही उगवते तारे आणि अनुभवी खेळाडू आहेत जे कधीही सामना बदलू शकतात.
हेड टू हेड रेकॉर्ड (NZ vs SL Head To Head Record)
न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात आतापर्यंत एकूण 97 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. या काळात न्यूझीलंड संघाचे पारडे जड झाले आहे. न्यूझीलंड संघाने 52 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने जिंकले आहेत. तर श्रीलंकेच्या संघाने केवळ 44 सामने जिंकले आहेत. त्याच वेळी, दोन सामन्यांचा निकाल लागला नाही. मागील पाच एकदिवसीय सामन्यांमध्ये न्यूझीलंडने 2, श्रीलंकेने 2 जिंकले आहेत तर 1 सामना निकालाविना संपला आहे.
मायदेशात एकदिवसीय सामन्यांमध्ये श्रीलंकेविरुद्ध न्यूझीलंडचा विक्रम उत्कृष्ट आहे. न्यूझीलंडने आत्तापर्यंत श्रीलंकेविरुद्ध मायदेशात खेळलेल्या 45 पैकी 30 एकदिवसीय सामने जिंकले आहेत आणि ते आपल्या वर्चस्वाचा विक्रम वाढवण्याचा प्रयत्न करतील. दुसरीकडे श्रीलंका न्यूझीलंडमधील विक्रम सुधारण्यास उत्सुक असेल.