New Zealand (Photo: @ESPNcricinfo)

New Zealand National Cricket Team vs Sri Lanka National Cricket Team 2nd ODI 2025 Scorecard:  न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना 8 जानेवारी रोजी सेडन पार्क, हॅमिल्टन  (Hamilton)  येथे खेळला गेला. या सामन्यात न्यूझीलंडने श्रीलंकेचा 113 धावांनी पराभव केला. श्रीलंकेला 37 षटकांत विजयासाठी 256 धावांची गरज होती. पण पाहुण्या संघ 142 धावांवरच मर्यादित राहिला. या विजयासह किवी संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. किवी संघाकडून रचिन रवींद्रने अर्धशतकी खेळी खेळली. ज्यासाठी सामनावीराची निवड करण्यात आली. रचिन रवींद्रने 63 चेंडूत 79 धावा केल्या. यादरम्यान त्याने 9 चौकार आणि 1 षटकार लगावला. याशिवाय मार्क चॅपमनने 52 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 62 धावा केल्या. (हेही वाचा  -  Champions Trophy Team: राहुल आणि शमीला संधी मिळेल का, अक्षर आणि जडेजापैकी कोण?)

रचिन रवींद्र आणि मार्क चॅपमन यांच्यात शतकी भागीदारी

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 9 गडी गमावून 255 धावा केल्या. या सामन्यात न्यूझीलंडची सुरुवात चांगली झाली होती. पाहुण्या संघाला पहिला धक्का 31 धावांवर विल यंगच्या रूपाने बसला. जेव्हा विल यंग 18 धावा करून बाद झाला. त्यानंतर रचिन रवींद्र आणि मार्क चॅपमन यांच्यात 100 हून अधिक धावांची भागीदारी झाली. मात्र या दोन्ही फलंदाजांना मोठी खेळी खेळण्यात अपयश आले. रचिन रवींद्रने 79 धावा, मार्क चॅपमनने 62 धावा, डॅरिल मिशेलने 38 धावा, ग्लेन फिलिप्सने 22 धावा आणि कर्णधार मिचेल सँटनरने 20 धावा केल्या.

तर श्रीलंकेसाठी महेश थेक्षानाने 8 षटकांत 44 धावा देत सर्वाधिक 4 बळी घेतले. तर वानिंदू हसरंगाने 2, असिथा फर्नांडोने 1 विकेट आणि इशान मलिंगाला 1 बळी मिळविला.

श्रीलंकेचे 22 धावांत 4 विकेट

256 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना उत्तर श्रीलंकेची सुरुवात विशेष झाली. श्रीलंकेला पहिला धक्का 6 धावांवर बसला. जेकब डफीने पथुम निसांकाला 1 धावांवर बाद केले. यानंतर श्रीलंकेने 5 षटकात 22 धावा आणि 4 विकेट गमावल्या. इथून पाहुण्या संघाला पुनरागमन करणे कठीण झाले. श्रीलंकेकडून कामिंडू मेंडिसने सर्वाधिक 64 धावा केल्या. याशिवाय जेनिथ लियानागेने 22 धावांचे योगदान दिले. पण श्रीलंकेकडून एकही फलंदाज मोठी खेळी खेळू शकला नाही आणि संघ 30.2 षटकांत 142 धावांवर आटोपला.

तर न्यूझीलंडकडून विल्यम ओरूर्कने सर्वाधिक ३ बळी घेतले. जेकब डफीने 2, मॅट हेन्रीने 1 बळी, नॅथन स्मिथला 1 आणि मिचेल सँटनरला 1 बळी मिळाला. तीन सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना 11 जानेवारीला होणार आहे.