IPL 2020 Eliminator: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) आणि सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) यांच्यात इंडियन प्रीमिअर लीग (Indian Premier League) 2020 चा एलिमिनेटर खेळला जाणार आहे. अबू धाबी येथे आजचा सामना खेळला जाणार आहे. आजच्या सामन्यात एसआरएचचा (SRH) कर्णधार डेविड वॉर्नरने (David Warner) टॉस जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघाने प्लेइंग इलेव्हनमध्ये काही मोठे बदल केले आहेत. स्पर्धेची धीमी सुरुवात झाल्यानंतर सनरायझर्सने दुसर्या टप्प्यात जोरदार कामगिरी करत गुणतालिकेत तिसरे स्थान पटकावत प्ले ऑफमध्ये प्रवेश केला, तर आरसीबीला मागील चारही सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. आजच्या सामन्यातील विजेता संघ दुसऱ्या क्वालिफायरमध्ये प्रवेश करेल, तर पराभूत पराभूत होणाऱ्या संघाच्या आयपीएलच्या प्रवासावर ब्रेक लागेल. आजच्या मुख्य सामन्यात दोन्ही संघाच्या दिग्गज खेळाडूंकडून मोठ्या डावाची अपेक्षा असणार आहे. (IPL 2020 Eliminator Live Streaming: सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यातील आयपीएल एलिमिनेटर लाईव्ह सामना व स्कोर पाहा Hotstar आणि Star Network वर)
हैदराबादच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल झाला असून आरसीबीने चार बदल केले आहेत. आरोन फिंच, अॅडम झांपा, मोईन अली आणि नवदीप सैनी यांना संधी दिली असून जोश फिलिप, क्रिस मॉरिस, शाहबाझ अहमद आणि ईसूरु उदाना यांना बाहेर केले आहेत. हैदराबादने रिद्धिमान साहाच्या जागी श्रीवत्स गोस्वामीचा समावेश केला आहे. गोलंदाजीत सनरायझर्सकडून संदीप शर्मा, होल्डर, शाहबाज नदीम, टी नटराजन आणि रशिद खानयांच्या रूपात इन-फॉर्मिंग गोलंदाज आहेत. संदीपने पॉवरप्लेमध्ये तर डेथ ओव्हर्समध्ये नटराजनने चांगली कामगिरी केली. मधल्या ओव्हरमध्ये राशिद बर्यापैकी किफायतशीर ठरला आहे.
पाहा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग इलेव्हन
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर: देवदत्त पडिक्क्ल, आरोन फिंच, विराट कोहली (कॅप्टन), एबी डिव्हिलिअर्स (विकेटकीपर), शिवम दुबे, मोईन अली, वॉशिंग्टन सुंदर, अॅडम झांपा, नवदीप सैनी, मोहम्मद सिराज आणि युजवेंद्र चहल.
सनरायझर्स हैदराबाद: डेविड वॉर्नर (कॅप्टन), श्रीवत्स गोस्वामी, मनीष पांडे, केन विलियम्सन, जेसन होल्डर, प्रियम गर्ग/अभिषेक नायर, अब्दुल समद, राशिद खान, संदीप शर्मा, टी नटराजन आणि शाहबाझ नदीम.