SRH vs RCB, IPL 2020 Eliminator Live Streaming: सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यातील आयपीएल एलिमिनेटर लाईव्ह सामना व स्कोर पाहा Hotstar आणि Star Network वर
इंडियन प्रीमियर लीग 2020 चा एलिमिनेटर सामना सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात रंगणार आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे. तसेच Disney+ Hotstar अॅपवरदेखील या सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे.
IPL 2020 Eliminator Live Streaming: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2020 चा एलिमिनेटर सामना सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) यांच्यात रंगणार आहे. अबू धाबीच्या (Abu Dhabi) शेख झायेद क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळला जाईल. प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्याच्या कठीण आव्हानांवर विजय मिळवणारा हैदराबाद संघ आपल्या विजयाची मालिका कायम ठेवून विजेतेपदाच्या दिशेने पुढचे पाऊल उचलण्यास सज्ज असतील, तर आरसीबीला (RCB) मागील सामन्यात पराभव पत्करावा लागला असल्याने आजच्या सामन्यात ते विजय मिळवून आपली गाडी रुळावर आणण्याचा प्रयत्न करतील. हैदराबाद आणि बेंगलोर यांच्यातील आजचा सामना भारतीय वेळेनुसार, आज 6 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता टॉस होणार असून सामना 7.30 वाजता सुरु होणार आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे. तसेच Disney+ Hotstar अॅपवरदेखील या सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे. रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि एअरटेलने त्यांच्या ग्राहकांना काही खास ऑफर दिल्या आहेत. ज्याच्या उपयोग करून यूजर्स ऑनलाईन मॅच पाहू शकतात. (IPL 2020 Qualifier 1: मुंबई इंडियन्सची सहाव्यांदा आयपीएल फायनलमध्ये धडक, चेन्नई सुपर किंग्सच्या 'या' कामगिरीची केली बरोबरी)
हैदराबाद आणि बेंगलोर यांच्यातील पराभूत झालेल्या संघाचे आयपीएलमधील आव्हान संपुष्टात येईल, तर विजेता संघाचा दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात दिल्ली कॅपिटल्सशी सामना होईल. पॉईंट्स टेबलवर आरसीबीच्या पुढे तिसरे स्थान मिळवून सनरायझर्सने प्ले ऑफमध्ये प्रवेश केला. स्पर्धेच्या लीग टप्प्यातील शेवटच्या सामन्यात दोन्ही संघांची कामगिरी पूर्णपणे वेगळी होती. आरसीबीने सलग चार सामने गमावल्यानंतर पॉइंट टेबलमध्ये चौथ्या स्थानावर तर सनरायझर्सने विजयाची हॅटट्रिक करत तिसरे स्थान मिळवले.
पाहा आरसीबी आणि एसआरएच संघ
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर: विराट कोहली (कॅप्टन), एबी डिव्हिलिअर्स (विकेटकीपर), पार्थिव पटेल, आरोन फिंच, जोश फिलिप, क्रिस मॉरिस, मोइन अली, मोहम्मद सिराज, शाहबाज अहमद, देवदत्त पडिक्कल, युजवेंद्र चहल, नवदीप सैनी, डेल स्टेन, पवन नेगी, इसुरु उडाना, शिवम दुबे, उमेश यादव, गुरकीरत सिंह मान, वाशिंगटन सुंदर, पवन देशपांडे आणि अॅडम झांपा.
सनराइजर्स हैदराबाद: डेविड वॉर्नर (कप्तान), जॉनी बेअरस्टो, केन विलियमसन, मनीष पांडे, श्रीवत्स गोस्वामी, विराट सिंह, प्रियम गर्ग, रिद्धिमान साहा, अब्दुल समद, विजय शंकर, मोहम्मद नबी, राशिद खान, जेसन होल्डर, अभिषेक शर्मा, संदीप शर्मा, संजय यादव, फॅबियन एलेन, पृथ्वी राज यारा, खलील अहमद, संदीप शर्मा, शाहबाज नदीम, सिद्धार्थ कौल, बिली स्टानलेक, टी नटराजन आणि बासिल थंपी.
(The above story first appeared on LatestLY on Nov 06, 2020 03:33 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

