Rehab Partners! शिखर धवन-हार्दिक पंड्या यांची पुनरागमन करण्याची तयारी सुरु, NCA मधून फोटो केला शेअर
शिखर धवन आणि हार्दिक पंड्या (Photo Credits: Instagram/@shikhardofficial)

टीम इंडिया (India) सध्या शानदार कामगिरी करत आहे, परंतु एक गोष्ट त्यांना सतावत आहे आणि ती म्हणजे दुखापत. टीम इंडियाचे प्रभावी खेळाडू सतत जखमी होत आहेत. न्यूझीलंडविरुद्ध पाचव्या टी-20 सामन्यादरम्यान सलामी फलंदाज रोहित शर्माला दुखापत झाली त्यानंतर त्याला वनडे आणि टेस्ट मालिकेला मुकावे लागले. त्यापूर्वी, शिखर धवन (Shikhar Dhawan), भुवनेश्वर कुमार, हार्दिक पंड्या (Hardik Pandya) यासारख्या खेळाडूंनाही दुखापतीमुळे टीममांडून बाहेर राहावे लागले. हार्दिक त्याच्या पाठीच्या समस्येवर झगडत आहे, तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यात शिखरच्या खांद्याला दुखापत झाली होती ज्यामुळे तो न्यूझीलंड (New Zealand) दौर्‍यासाठी उपलब्ध होऊ शकला नाही. दोन्ही खेळाडू सध्या बेंगळुरू येथील नॅशनल क्रिकेट अकादमी (एनसीए) पुनर्वसन करीत असून दुखापतीतून सावरत आहे. या दरम्यान धवनने हार्दिकबरोबर इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे.

फोटोला कॅप्शन देताना 'गब्बर' ने लिहिले, "रेहॅब पार्टनर, बळकटपणे पुनरागमन करेल." दोन्ही खेळाडू न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेसाठी उपलब्ध असेल अशी अपेक्षा होती पण त्यानंतर त्यांना बाहेर करण्यात आले. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकाविरुद्ध कसोटी मालिकेतून बाहेर पडल्यानंतर नुकताच भारतीय संघात परतलेला सहकारी रिद्धीमान साहा नेही फोटोवर प्रतिक्रिया व्यक्त केली. साहाने "लवकरात लवकर बरे व्हा" या संदेशासह प्रतिक्रिया दिली आणि हार्दिकने थँक्स यू इमोजीने प्रतिसाद दिला. साहा सध्या टेस्ट संघात विकेटकीपर म्हणून पहिली पसंती आहे.

 

View this post on Instagram

 

Coming back stronger. Rehab partners 👊 @hardikpandya93

A post shared by Shikhar Dhawan (@shikhardofficial) on

हार्दिक मागील वर्षी सप्टेंबरपासून टीम इंडियातून बाहेर आहे. ऑक्टोबरमध्ये त्याच्या पाठीच्या खालच्या बाजूवर शस्त्रक्रिया करण्यात आली. मार्चपासून इंडियन प्रीमियर लीग सुरू होण्यापूर्वी तो पुनरागमन करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. शिवाय, काही दिवसांपूर्वीच बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी स्पष्ट केले होते की प्रत्येक खेळाडूला पुनर्वसनसाठी एनसीए येथे यावे लागेल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी अकादमीकडून फिटनेस प्रमाणपत्र घ्यावे लागेल.