हटके ट्विटद्वारे सचिन तेंडूलकर #KingKhan ला म्हणाला #HappyBirthdaySRK ; इतर खेळाडूंकडूनही शुभेच्छांचा वर्षाव
सचिन तेंडूलकर I शाहरुख खान (Photo Credits: Twitter @Sachin_RT)

बॉलिवूडच्या किंग खानचा आज 53 वा वाढदिवस. जगभरातून लाखो चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. यात खेळाडूही मागे नाहीत. मास्टर बास्टर सचिन तेंडूलकरने किंग खान शाहरुख खानला हटके स्टाईलने शुभेच्छा दिल्या आहेत. पहिल्या कमाईतून शाहरुख खानने केले 'हे' काम !

राज आणि राहूल या शाहरुखच्या गाजलेल्या व्यक्तीरेखा. त्यामुळेच शुभेच्छा देताना सचिनने ट्विटमध्ये लिहिले की, "राज आणि राहूल हे शाहरुख खान नसता तर त्या भूमिका इतक्या प्रभावी झाल्या नसत्या. येणारे पुढील वर्ष तुला खूप छान जावो. वाढदिवसाच्या शुभेच्छा शाहरुख खान."

मास्टर बास्टर सचिन तेंडूलकरशिवाय इतर खेळाडूंनीही रोमान्सचा बादशाह शाहरुखला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

दमदार अभिनय, रोमान्टीक अंदाज आणि हटके स्टाईल यामुळे शाहरुख खान बॉलिवूडचा बादशाह झाला. यामुळेच तो प्रेक्षकांच्या मनावर अजूनही अधिराज्य गाजवत आहे.