शाहरुख खान हा बॉलिवू़डचा बादशाहा, किंग खान आहे. देशातच नाही तर देशाबाहेरही त्याचे करोडो चाहते आहे. मालिकांपासून सुरु झालेला शाहरुखचा प्रवास सिनेमांपर्यंत पोहचला आणि अजूनही तो चालूच आहे. पण बॉलिवूडच्या किंग खानच्या या काही खास गोष्टी अनेकांना ठाऊक नाहीत. तर बर्थडे निमित्त जाणून घेऊया शाहरुखच्या या काही खास गोष्टी.....
किंग खानच्या आवडीचा आहे हा नंबर
शाहरुख खानच्या बहुतेक सर्वच गाड्यांच्या नंबरमध्ये 555 हा नंबर असतो, असे बोलले जाते. त्याचबरोबर त्याच्या स्टाफचे मोबाईल नंबर्समध्ये देखील 555 हा नंबर आवार्जून असतो.
हंसराज कॉलेजचा लव्हर बॉय
दिल्ली विश्वविद्यालयाच्या हंसराज कॉलेजमध्ये एक खास जागा आहे. त्या जागेला लवर्स पॉईंट बोलले जाते. शाहरुख खानने गौरीला तिथेच प्रपोज केले होते, असे बोलले जाते. तेव्हापासून त्या जागेला लवर्स पॉईंट हे नाव पडले.
28 वर्षांनंतर मिळाली ग्रॅज्युएशनची डिग्री
शाहरुख खान हंसराज कॉलेजमधून 1988 मध्ये पासआऊट झाला. त्याने इकोनॉमिक्स विषय घेऊन ग्रॅज्युएशन केले आहे. पण त्याला 2016 पर्यंत ग्रॅज्युएशनची डिग्री मिळाली नव्हती. 2016 मध्ये जेव्हा फॅन सिनेमाच्या प्रमोशनसाठी शाहरुख पुन्हा कॉलेजमध्ये गेला तेव्हा प्राचार्या डॉ. रमा यांनी 28 वर्ष जूनी डिग्री शाहरुखला भेट म्हणून दिली.
सलमान खानला दिला स्वतःचा पुरस्कार
1998 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून सिने अवॉर्ड मिळाल्यानंतर शाहरुखने सलमानला स्टेजवर बोलवून आपला पुरस्कार दिला आणि सलमानला दोन शब्द बोलण्याचीही विनंती केली.
स्क्रिप्ट न ऐकताच साईन केला DDLJ
आपल्या करिअरमधील सर्वात महत्त्वाचा आणि खास 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' हा सिनेमा शाहरुखने न वाचताच किंवा न ऐकताच साईन केला होता. आदित्य चोप्रासोबतच्या खास मैत्रीपोटी शाहरुखने असे केले.
शाहिद कपूरला दिला अभिनयाचा सल्ला
शाहिद कपूरला अभिनयासाठी शाहरुख खाननेच प्रोत्साहित केले, असे खुद्द शाहिदचे म्हणणे आहे. जेव्हा शाहरुखने शाहिदला शामक दावरच्या ग्रुपमध्ये डान्स करताना पाहिले तेव्हाच त्याने त्याच्यातील कला हेरली.
शाहरुख खानला आईस्क्रीम आवडत नाही
हे थोडसं आर्श्चयचकीत करणार आहे. पण असे बोलले जाते की, शाहरुखला आईस्क्रीम अजिबात आवडत नाही.
शाहरुख अजूनही घातलो लग्नाची अंगठी
लग्नाच्या इतक्या वर्षानंतरही शाहरुख अजूनही आपल्या उजव्या हातात लग्नाची अंगठी (वेडिंग रिंग) घातलो. यातूनच त्याचे गौरीवर असलेले प्रेम झळकते.
हे आहे किंग खानचे खरे नाव
शाहरुखच्या आजीने (आईच्या आईने) शाहरुखचे नाव अब्दुल रहमान ठेवले होते. पण त्यांच्या वडिलांना हे नाव अजिबात आवडले नाही. म्हणून त्यांनी ते नाव बदलून शाहरुख हे नाव ठेवले.
पहिल्या पगारातून केले हे काम
खरंतर प्रत्येक व्यक्ती आपल्या पहिल्या पगारातू काहीतरी खास करु इच्छिते. साधारणपणे पहिल्या पगारातून हा आई-वडिल किंवा गर्लफ्रेंडसाठी गिफ्ट घेतले जाते.
शाहरुखची पहिली कमाई होती फक्त 50 रुपये आणि यातून तो दिल्लीहून आग्र्याला ताजमहल पाहण्यासाठी गेला.