Sachin Tendulkar ने केली COVID वर मात, बरा होऊन घरी परतल्यानंतर ट्विटद्वारे वैद्यकिय कर्मचा-यांसह चाहत्यांचे मानले आभार, See Tweet
सचिन तेंडुलकर (Photo Credit: Getty)

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याला कोरोनाची लागण झाल्याचे कळताच जगभरातील त्याच्या चाहत्यांनी तो लवकरात लवकर व्हावा यासाठी प्रार्थना केली. 27 मार्चला सचिनला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याने घरातच स्वत:ला क्वारंटाईन करुन घेतले होते. त्यानंतर अधिक योग्य उपचारासाठी आणि खबरदारी म्हणून तो मुंबईतील रुग्णालयात दाखल झाला. आज तो रुग्णालयातून बरा होऊन घरी परतला आहे. घरी परतल्यानंतर त्याने ट्विटच्या माध्यमातून त्याच्यासाठी प्रार्थना करणा-या सर्व चाहत्यांचे तसेच रुग्णालयात त्याची काळजी घेणा-या वैद्यकीय कर्मचा-यांचे आभार मानले आहेत.

"मी नुकताच रुग्णालयातून बरा होऊन घरी आलो आहे. आता माझी प्रकृती ठिक असून मी काही दिवसांसाठी घरात आयसोलेशनमध्ये राहणार आहे. सर्वांनी माझ्यासाठी केलेल्या प्रार्थनांसाठी सर्वांचे मनापासून आभार. तसेच माझ्यावर उपचार करणा-या सर्व वैद्यकिय कर्मचा-यांचेही आभार. गेले वर्षभर ते सर्व आपल्यासाठी दिवस-रात्र एक करून झटत आहे." असे ट्विट सचिनने केले आहे.हेदेखील वाचा- Sachin Tendulkar कोरोनाबाधित झाल्यानंतर आज 6 दिवसांनी खबरदारीचा उपाय म्हणून रूग्णालयात दाखल

27 मार्च 2021 ला सचिन तेंडुलकरने सोशल मीडीयाच्या माध्यमातून त्याची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असून तो होम क्वारंटीन राहणार असल्याचं त्याने म्हटलं होतं. मात्र 2 एप्रिल रोजी पुन्हा सचिनने ट्वीट करत वैद्यकीय सल्ल्यानुसार आणि खबरदारीचा उपाय म्हणून आता हॉस्पिटल मध्ये दाखल होत असल्याचं सांगितले.

दरम्यान सचिन तेंडुलकर काही दिवसांपूर्वी रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये खेळाडू म्हणून सहभागी झाला होता. सचिनच्या पाठोपाठ या सीरीज मध्ये सहभागी युसूफ पठाण, एस बद्रीनाथ, इरफान पठाण देखील कोरोनाबाधित असल्याचं समोर आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.