Sachin Tendulkar (Photo Credit-PTI)

क्रिकेटच्या मैदानात मास्टर ब्लास्टर अशी ओळख असणारा भारतीय क्रिकेटर आणि खासदार सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आज (2 एप्रिल) कोरोनाची लागण झाल्यानंतर 6 दिवसांनी हॉस्पिटलमध्ये दाखल झाला आहे. 27 मार्च 2021 ला सचिन तेंडुलकरने सोशल मीडीयाच्या माध्यमातून त्याची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असून तो होम क्वारंटीन राहणार असल्याचं त्याने म्हटलं होतं. मात्र आज पुन्हा सचिनने ट्वीट करत वैद्यकीय सल्ल्यानुसार आणि खबरदारीचा उपाय म्हणून आता हॉस्पिटल मध्ये दाखल होत असल्याचं त्याने म्हटलं आहे.

दरम्यान 47 वर्षीय सचिन तेंडुलकरने आपण लवकरच कोविड 19 वर मात करून घरी परतणार असल्याचा विश्वासही व्यक्त केला आहे. सचिन तेंडुलकर वगळता त्याच्या कुटुंबामध्ये कोणाचीही कोविड चाचणी पॉझिटिव्ह आलेली नाही. नक्की वाचा:  'लॉकडाऊन कराच'; हरभजन सिंह यांचं रोखठोक ट्विट.

सचिन तेंडुलकर

सचिन तेंडुलकरने आज त्याच्या प्रकृतीची माहिती देत असतानाच टीम इंडियाने विश्वचषक जिंकल्याला 10 वर्ष पूर्ण झाल्याने खेळाडूंचे, क्रिकेट चाहत्यांचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा देखील दिल्या आहेत .

दरम्यान सचिन तेंडुलकर काही दिवसांपूर्वी रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये खेळाडू म्हणून सहभागी झाला होता. सचिनच्या पाठोपाठ या सीरीज मध्ये सहभागी युसूफ पठाण, एस बद्रीनाथ, इरफान पठाण देखील कोरोनाबाधित असल्याचं समोर आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.