नुकतीच श्रीलंका लेजेन्ड्सला पराभूत करून रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये (Road Safety World Series) विजेतेपद जिंकणाऱ्या इंडिया लेजेन्ड्सच्या संघातील (India Legends Team) आणखी एका खेळाडूची कोरोना (Coronavirus) चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. इंडिया लेजेन्ड्स संघाचा कर्णधार मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar), अष्टपैलू खेळाडू युसूफ पठाण (Yusuf Pathan), फलंदाज एस बद्रीनाथ (S. Badrinath) यांच्यानंतर आता वेगवान गोलंदाज इरफान पठाण (Irfan Pathan) यालाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. इरफान पठाणने स्वत: ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.
इरफान पठाणने ट्विट करून म्हटले आहे की, मी कोणत्याही लक्षणांशिवाय कोरोना पॉझिटिव्ह आढळलो आहे. मी स्वत:ला आयसोलेट केले असून घरात क्वारंटाइन आहे. तसेच माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनीच त्यांची कोरोना चाचणी करून घ्यावी. याचबरोबर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने मास्क घालावे आणि सोशल डिस्टंसिन्गचे पालन करावे, असेही आवाहन इरफान पठाणने केले आहे. हे देखील वाचा-श्रीलंकेचा ऑलराऊंडर Thisara Perera चमकला; एका ओव्हरमध्ये ठोकले 6 षटकार, पाहा व्हिडिओ
इरफान पठाणचे ट्वीट-
— Irfan Pathan (@IrfanPathan) March 29, 2021
रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजच्या अंतिम सामन्यात इंडिया लेजेंड्सने श्रीलंका लेजेन्ड्स 14 धावांनी पराभूत करून विजेतेपद पटकावले आहे. या सामन्यात इरफान पठाण आणि युसुफ पठाण या दोन्ही भावांनी चमकदार कामगिरी बजावत संघाला जेतेपद पटकावण्यात मोलाचा वाटा उचलला होता. युसुफ पठाणने अंतिम सामन्यात तडाखेबाज फलंदाजी केली होती. त्याने 36 चेंडूंत 62 धावा ठोकल्या होत्या. युसूफ पठाणने फलंदाजीत नाबाद 62 धावा केल्या आणि गोलंदाजीतही उत्कृष्ट कामगिरी केली होती. युसूफने 4 षटकांत 26 धावा देऊन 2 गडी बाद केले होते. तर, इरफान पठाणने 4 षटकांत 29 धावा देऊन 2 विकेट्स घेतले होते.