श्रीलंकेचा ऑलराऊंडर Thisara Perera चमकला; एका ओव्हरमध्ये ठोकले 6 षटकार, पाहा व्हिडिओ
Thisara Perera (Photo Credit: Twitter)

क्रिकेट इतिहासात एका ओव्हरमध्ये 6 षटकार ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत आता श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू थिसरा परेरा (Thisara Perera) याचाही समावेश झाला आहे.  एकाच षटकात 6 षटकार ठोकणारा थिसरा परेरा हा श्रीलंकेचा पहिला खेळाडू ठरला आहे. श्रीलंकेमध्ये सध्या श्रीलंका क्रिकेट बोर्ड आयोजिक मेजर क्लब्स स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत खेळताना थिसेरा परेराने हा पराक्रम केला आहे. त्याने रविवारी (28 मार्च) आर्मी स्पोट्स क्रिकेट क्लबकडून खेळताना एका षटकात सलग 6 षटकार मारण्याचा पराक्रम केला आहे. तसेच त्याने जलद अर्धशतक ठोकण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

रविवारी आर्मी स्पोर्ट्स क्लब विरुद्ध ब्लूमफिल्ड क्रिकेट आणि ऍथलेटिक क्लब यांच्यात पार पडला. मात्र, पावसामुळे हा सामना 41 षटकांचा खेळवण्यात आला होता. या सामन्यात आर्मी स्पोर्ट्स क्लब प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरले. महत्वाचे म्हणजे, या सामन्याचे केवळ 20 चेंडू शिल्लक राहिले असता कर्णधार थिसरा परेरा 5 व्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आला. त्यानंतर धिल्हन कुरेने टाकलेल्या एका षटकार त्याने सलग 6 षटकार मारण्याचा कारनामा केला. तसेच केवळ 13 चेंडूत अर्धशकत करण्याचा विक्रमही स्वत:च्या नावावर नोंदवला आहे. हे देखील वाचा- IND vs ENG 3rd ODI 2021: टीम इंडियाने तिसऱ्या वनडेत केले असते ‘हे’ काम तर वेळेपूर्वीच लागला असता सामन्याचा निकाल

ट्विट-

क्रिकेटमध्ये एकाच षटकात 6 षटकार मारणारा परेरा हा एकूण 9 वा क्रिकेटपटू ठरला आहे. यापूर्वी सर गॅरी सोबर्स, रवी शास्त्री, हर्षल गिब्स, युवराज सिंग, रॉस व्हाईटली, हझरतुल्लाह झझाई, लिओ कार्टर आणि कायरन पोलार्ड यांनी असा कारनामा केला आहे.