IND vs ENG 3rd ODI 2021: टीम इंडियाने तिसऱ्या वनडेत केले असते ‘हे’ काम तर वेळेपूर्वीच लागला असता सामन्याचा निकाल
विराट कोहली (Photo Credit: PTI)

IND vs ENG 3rd ODI 2021: पुण्याच्या (Pune) एमसीए स्टेडियमवर (MCA Stadium) झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाने (Indian Team) 7 धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. इंग्लंडविरुद्ध (England) पहिले फलंदाजी करत यजमान संघाने 330 धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात इंग्लिश टीमच्या फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे संघ 322 धावाच करू शकला. इंग्लंडसाठी सॅम कुरने आपल्या अर्धशतकी खेळीसह विजयाच्या आशा पल्लवित ठेवल्या मात्र दुर्दैवाने तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. विशेष म्हणजे थरारक सामन्यात टीम इंडियाने निर्णायक क्षणी एक चूक अनेक वेळा केली ज्यामुळे सामना वेळेत पूर्ण होऊ शकला नाही आणि ती म्हणजे यजमान संघाने अनके महत्वपूर्ण कॅच सोडले. भारतीय संघाने बेन स्टोक्स (Ben Stokes), सॅम कुरन (Sam Curran) आणि मार्क वूडचे कॅच ड्रॉप केले ज्यामुळे इंग्लिश टीम तीनशे पार धावांपर्यंत मजल मारू शकली. (IND vs ENG 3rd ODI 2021: रोहित शर्मा-शिखर धवनचा पराक्रम, मालिकेत झाली षटकारांची उधळण, पहा तिसऱ्या सामन्यात बनलेले प्रमुख रेकॉर्ड)

इंग्लिश फलंदाज स्टोक्स 15 धावांवर फलंदाजी करताना बाउंड्री लाईनवर हार्दिक पांड्याने त्याचा सोडला. मात्र, त्याचा संघाला अधिक फटका बसला नाही आणि स्टोक्स 35 धावा करून बाद झाला. यानंतर, निर्णयक क्षणी सॅम कुरनला देखील अनेकदा जीवनदान मिळाले ज्याच्या परिणामी 8व्या क्रमांकावर फलंदाजीला येत त्याने भारताविरुद्ध सर्वाधिक नाबाद 95 धावांचा डाव खेळला. शिवाय, शार्दूल ठाकूरने मार्क वूडचा देखील सोप्पा झेल सोडला. मात्र, नंतर तो चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात रनआऊट झाला. वूडने 14 धावांची खेळी केली आणि सॅम कुरनला चांगली साथ दिली. दरम्यान, भारतीय फिल्डर्सची ही चूक विशेषतः सॅम कुरनचा झेल सोडणंसंघाला नक्कीच महागात पडली असती. शिवाय, सामन्याचा निकालही नियोजित वेळेत लागला असता.

दुसरीकडे, भारत दौऱ्यावर आलेल्या इंग्लंडवर यजमान संघाने निर्विवाद वर्चस्व गाजवलं. कसोटी मालिकेने सुरु झालेल्या द्विपक्षीय मालिकेत भारतीय संघाचा वरचष्मा राहिला. कसोटी मालिकेत 3-1 तर पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत 4-1 आणि अखेरीस वनडे मालिकेत 2-1 असा विजय मिळवत इंग्लंड संघाला दौऱ्यावरून रिकाम्या हातीच घरी जाण्यास भाग पाडले.