IND vs ENG 3rd ODI 2021: रोहित शर्मा-शिखर धवनचा पराक्रम, मालिकेत झाली षटकारांची उधळण, पहा तिसऱ्या सामन्यात बनलेले प्रमुख रेकॉर्ड
टीम इंडिया (Photo Credit: PTI)

IND vs ENG 3rd ODI 2021: पुण्याच्या (Pune) महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर रंगलेल्या इंग्लंडविरुद्ध (England) तीन सामन्यांच्या मालिकेच्या अखेरच्या वनडे मालिकेत टीम इंडियाने (Team India) 7 धावांनी दणदणीत विजय मिळवला आणि 2-1 अशी मालिका खिशात घातली. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात भारतीय संघाने दिलेल्या 330 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात इंग्लिश टीम 322 धावांच करू शकली. संघासाठी सॅम कुरने (Sam Curran) नाबाद 95 धावा केल्या मात्र संघाला विजयीरेष ओलांडून देऊ शकला नाही. डेविड मलाने वनडे कारकिर्दीतील पहिले अर्धशतक ठोकले आणि 50 धावा केल्या. दुसरीकडे, भारताकडून भारताकडून शार्दूल ठाकूरला 4 तर भुवनेश्वर कुमारला 3 विकेट मिळाल्या आणि टी नटराजनने 1 गडी बाद केला. यापूर्वी, फलंदाजी करत संघासाठी शिखर धवन, रिषभ पंत आणि हार्दिक पांड्या यांनी अर्धशतकी खेळी करत संघाला आव्हानात्मक धावसंख्या गाठून दिली. आजच्या सामन्यात दोन्ही संघाने काही प्रमुख रेकॉर्डही केले जे खालीलप्रमाणे आहेत. (IND vs ENG 3rd ODI 2021: अटीतटीच्या सामन्यात भारताकडून इंग्लंडचा सफाया, तिसऱ्या वनडे सामन्यासह 2-1 ने जिंकली मालिका)

1. भारत-इंग्लंड संघाने तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत सर्वाधिक षटकारांची नोंद केली. तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात भारताने 18 षटकार ठोकले आणि या मालिकेतील एकूण षटकारांची संख्या 70 वर नेली. यापूर्वी न्यूझीलंड-श्रीलंका संघाने 2019 मालिकेत एकूण 57 षटकार ठोकले होते.

2. रोहित शर्मा आणि शिखर धवनची स्टार ओपनिंग जोडी पुन्हा एकदा शतकी भागीदारी करण्यात यशस्वी झाली. रोहित-धवन जोडीने वनडेमध्ये 5000 हुन धावांची भागीदारी करणारी भारताची दुसरी सलामी जोडी बनली आहे.

3. रोहित आणि धवनने ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅडम गिलक्रिस्ट आणि मॅथ्यू हेडनच्या स्टार जोडीचा मोठा विक्रमही मोडला आहे. भारतीय जोडीने सर्वाधिक शतकी भागीदारीमध्ये गिलख्रिस्ट आणि हेडनच्या 16 भागीदारीचा विक्रम मोडला. रोहित-धवनने आता 17 वेळा शतकी भागीदारी केली आहे.

4. रोहित-धवन जोडीने 32व्या वेळी 50+ धावांची भागीदारी केली आणि ऑस्ट्रेलियाच्या डेविड बून आणि जेफ मॉर्शच्या जोडीची बरोबरी केली.

5. भारतीय कर्णधार विराट कोहली 200 सामन्यात संघाचे नेतृत्व करणारा भारताचा तिसरा तर जगातील नववा कर्णधार ठरला आहे.

6. इंग्लंडविरुद्ध रिषभ पंतने सर्वाधिक 78 धावांची झुंजार खेळी केली. पंतच्या 78 धावा त्याच्या वनडे करिअरमधील आजवर सर्वोत्तम धावसंख्या ठरली.

7. इंग्लंड फिरकीपटू मोईन अलीने भारतीय कर्णधार विराट कोहलीला वैयक्तिक 7 धावांवर बोल्ड केलं. यासह मोईनने आंतरराष्ट्रीय क्रिकेट नवव्यांदा विराटची शिखर केली.

8. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहली फिरकी गोलंदाजाकडून फक्त दोन वेळा क्लीन बोल्ड झाला आहे आणि तो गोलंदाज मोईन अली आहे. फिरकीपटू म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केवळ मोईन अलीने दोनदा विराटचा त्रिफळा उडवला आहे.

9. इंग्लंडचा भारतात द्विपक्षीय मालिकेतील हा 10 वा पराभव ठरला आहे. यापूर्वी इंग्लिश टीमने 1984/85 मध्ये भारतात आजवरचा एकमात्र विजय मिळवला आहे. यासह टीम इंडियाने भारतात इंग्लंडविरुद्ध द्विपक्षीय वनडे सामन्यात 7वा विजय मिळवला आहे.

10. इंग्लंडच्या 7 गोलंदाजांनी भारताविरुद्ध तिसर्‍या वनडे सामन्यात किमान 1 विकेट घेतली आणि 45 वर्षांनंतर इंग्लंड असा पराक्रम करणारा पहिला संघ ठरला. यापूर्वी 1975/76 मध्ये न्यूझीलंडच्या 7 गोलंदाजांनी भारताविरुद्ध एकदिवसीय सामन्यात कमीतकमी 1 गडी बाद केला होता.

11. सॅम कुरने भारताविरुद्ध आठव्या स्थानावर फलंदाजी करत सर्वाधिक वैयक्तिक धावांची नोंद केली आहे. कुरन 95 धावा करून नाबाद परतला.