राज्यातील कोरोना वाढती रुग्णसंख्या आणि नागरिकांकडून होत असलेले नियमांचे उल्लंघन यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी प्रशासनाला लॉकडाऊनचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर सर्वच स्तरातून प्रतिक्रीया येऊ लागल्या आहेत. क्रिकेटर हरभजन सिंह (Harbhajan Singh) याने देखील आपले रोखठोक मत ट्विटच्या माध्यमातून मांडले आहे. तसंच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांप्रती संतापही व्यक्त केला आहे.
हरभजन सिंह याने आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, "लोक जर ऐकत नसतील तर लॉकडाऊन कराच. लोक केव्हा आणि कसा हा मुद्दा गांभीर्याने घेणार हे कळत नाही." दरम्यान, नागरिक कोरोना नियमांचे पालन करत नसल्यामुळे रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे लॉकडाऊनचे नियोजन करण्याचे निर्देश काल मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिले. एएनआयच्या या ट्विटला रिप्लाय देताना हरभजन सिंह याने असे रोखठोक ट्विट केले आहे. खरंतर नागरिकांकडून होणारे नियमांचे उल्लंघनावर संताप व्यक्त करताना हरभजन सिंह याने असे म्हटले आहे.
हरभजन सिंह ट्विट:
Do the lockdown as people are not gonna listen.. don’t know when we will understand and how.. 😡 https://t.co/DjiQjOGeKX
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) March 29, 2021
कोरोना रुग्णवाढीमुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. मात्र लॉकडाऊनला भाजपा सोबतच राष्ट्रवादी काँग्रेसने देखील विरोध केला आहे. तसंच आरोग्य सेवा वाढवणे गरजेचे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. (Nawab Malik on Lockdown: लॉकडाऊन राज्याला आणि जनतेला न परवडणारा- नवाब मलिक)
दरम्यान, आज राज्यात 31,643 नवे रुग्ण आढळून आले असून 102 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 20,854 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून 3,36,584 सक्रीय रुग्ण आहेत.