मनीष पांडे (Photo Credit: PTI)

RR vs SRH, IPL 2020: इंडियन प्रीमिअर लीगच्या (Indian Premier League) 40व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) पहिले फलंदाजी करत दिलेल्या 155 धावांच्या प्रत्युत्तरात सनरायझर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) मनीष पांडे (Manish Pandey) आणि विजय शंकरच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर 8 विकेट आणि 11 चेंडू शिल्लक असताना एकतर्फी विजय मिळवला. रॉयल्सने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादसाठी मनीष पांडेने सर्वाधिक 83 धावांचा डाव खेळला तर विजय शंकरने (Vijay Shankar) नाबाद 52 धावांचे योगदान दिले. पांडे आणि विजय यांच्यात शतकी भागीदारीने हैदराबादला एकहाती विजय मिळवून दिला. शिवाय, धावांचा पाठलाग करताना सनरायजर्सचा हा यंदाचा पहिला विजय ठरला. दुसरीकडे, राजस्थानसाठी एकमेक जोफ्रा आर्चरला (Jofra Archer) 2 घेण्यात यश मिळाले आहेत. हैदराबादचा 10 सामन्यातील हा चौथा विजय होता. एसआरएचने आजच्या सामन्यात विजय मिळवत गुणतालिकेत मोठी झेप घेतली आणि 8 गुणांसह पाचव्या स्थानावर पोहचले आहे, तर रॉयल्सची सातव्या स्थानी घसरण झाली आहे. (RR vs SRH, IPL 2020: रॉयल्सविरुद्ध सनरायजर्स गोलंदाजांचा हल्ला बोल, राजस्थानचे हैदराबादला विजयासाठी 155 धावांचे लक्ष्य)

एसआरएच कर्णधार आणि सलामीवीर फलंदाज डेविड वॉर्नर जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर अवघ्या 4 धावांवर बाद झाला. बेअरस्टोदेखील काही खास कामगिरी करण्यात अपयशी ठरला आणि जोफ्रा आर्चरने 10 धावांवर क्लीन बोल्ड केले. त्यांनतर मनीष पांडे आणि विजय शंकरच्या जोडीने आपली विकेट सांभाळून डाव खेळला आणि संघाला विजयी रेष ओलांडून दिली. दरम्यान, या पराभवासह रॉयल्सचा आयपीएल प्ले ऑफमध्ये पोहचण्याचे स्वप्न भंग झाले. राजस्थानने 11 पैकी 4 सामने जिंकले असून 7 सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला आहे.

यापूर्वी, आयपीएलमध्ये यंदाच्या मोसमातली आपली पहिलाच सामना खेळणाने जेसन होल्डर चमकदार कामगिरी केली. हैदराबादने राजस्थानला 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 154 धावांवर रोखले. होल्डरने 4 ओव्हरमध्ये 33 धावा देऊन सर्वाधिक 3 विकेट घेतल्या आणि एक रन आऊटही केला तर विजय शंकर आणि राशिद खान यांना प्रयेकी एक विकेट मिळाली. राजस्थानकडून संजू सॅमसनने सर्वाधिक 36 धावा केल्या, तर बेन स्टोक्सला त्याच्या 30 धावांसाठी संघर्ष करावा लागला.