IND vs SL (PC - Twitter)

IND vs SL T20 Series 2023: भारत आणि श्रीलंका (IND vs SL T20 Series 2023) वर्षाची सुरुवात एकमेकांविरुद्ध खेळून करतील. भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेत श्रीलंकन ​​संघासाठी चांगली गोष्ट म्हणजे त्यांना रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli), जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) यांसारख्या खेळाडूंचा सामना करावा लागणार नाही. पाहुण्या संघाचा कर्णधार दासुन शनाकाला (Dasun Shanaka) सर्वाधिक धावा (India vs Sri Lanka Most Runs Record) करण्याच्या बाबतीत रोहित शर्माला मागे टाकून पहिल्या क्रमांकावर येण्याची संधी असेल. भारत आणि श्रीलंका यांच्यात आतापर्यंत एकूण 29 टी-20 सामने झाले आहेत. भारत या मध्ये वरचढ राहिला आहे. दोन्ही देशांमध्ये आतापर्यंत एकूण 9 टी-20 मालिका खेळल्या गेल्या आहेत.

या दोघांमध्ये टी-20 मध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर आहे, मात्र या मालिकेत हा विक्रम मोडला जाऊ शकतो. श्रीलंका संघाचा कर्णधार दासुन शनाका विक्रम मोडून पहिल्या क्रमांकावर येण्याच्या जवळ आहे. (हे देखील वाचा: IND vs SL T20I Series 2023: टी-20 मालिकेतील 'या' मोठ्या खेळाडूंवर सर्वांच्या असतील नजरा, करु शकतात मोठी कामगिरी)

 हार्दिक पांड्याकडे टी-20 चे कर्णधारपद

रोहित शर्मा श्रीलंका संघाविरुद्ध टी-20 मालिका खेळणार नाही, तो एकदिवसीय मालिकेत कर्णधार असेल. रोहितच्या अनुपस्थितीत टीम इंडियाची कमान हार्दिक पांड्याकडे असेल. सध्या रोहित शर्मा भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. रोहितने 19 सामन्यांच्या 17 डावात एकूण 411 धावा केल्या आहेत. रोहितने 1 शतक आणि 1 अर्धशतक खेळी केली आहे. या यादीत शिखर धवन दुसऱ्या क्रमांकावर आणि विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर आहे, मात्र हे दोघेही या मालिकेत खेळत नाहीत. दासुन शनाका या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे, पण त्याला रोहितला मागे टाकून नंबर वन होण्याची संधी आहे.

शनाका रोहितला टाकू शकतो मागे

शनाकाने 19 सामन्यांच्या 17 डावांमध्ये 306 धावा केल्या आहेत. त्याने एक शतक आणि एक अर्धशतकी खेळीही खेळली आहे. शनाकाला 106 धावांची गरज आहे, हे केल्यावर तो रोहितला मागे टाकून पहिल्या क्रमांकावर येईल. शनाकाला 3 डावात 106 धावांची गरज असून, या मालिकेत रोहितला मागे टाकून पहिल्या क्रमांकावर येण्याची सुवर्णसंधी त्याच्याकडे असेल.