टेस्ट क्रिकेटला (Test Cricket) सर्वात कठीण मानले जाते आणि म्हणून प्रत्येक खेळाडू कारकिर्दीत या फॉरमॅटमध्ये देशाचे नेतृत्वात करण्यासाठी उत्सुक असतो. भारताकडून (India) बरेच खेळाडू कसोटी क्रिकेट खेळले, ज्यामध्ये कोणी खूप यशस्वी झाला असेल तर बरेच खेळाडू जास्त यशस्वी होऊ शकले नाहीत. कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी विक्रमी कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची कमतरता नाही आणि व्हीव्हीस लक्ष्मण, राहुल द्रविड रोहित शर्मा (Rohit Sharma), सुरेश रैना, वीरेंद्र सहवाग (Virender Sehwag) आणि प्रवीण अमरे (Pravin Amre) यांचा समावेश आहे. कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल स्थानावर फलंदाज करून टिकून राहणे जितके महत्वाचे तितकेच खालच्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्यांचेही महत्व कमी नसते. रोहित, रैना, सेहवाग आणि अमरे, या चारही खेळाडूंच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये वेगळ्या विक्रमाची नोंद आहे. या सर्वांनी आपल्या कवटी डेब्यू सामन्यात शतक ठोकले होते, पण चौघांनी 6 व्या किंवा खालच्या स्थानावर फलंदाजी करून ही कामगिरी केली होती. त्यामुळेकसोटी पदार्पण सामन्यात 6 व्या किंवा त्याखालील क्रमांकावर फलंदाजी करतशतक ठोकणारे हे चारच खेळाडू भारतीय खेळाडू आहेत. (सचिन तेंडुलकरच्या वनडे दुहेरी शतकाबाबत दक्षिण आफ्रिकी डेल स्टेनचा सनसनाटी दावा, अंपायरवर लगावला आरोप)
अमरे हे पहिले भारतीय होते. त्यांनी भारताकडून 11 कसोटी सामने खेळले होते आणि 1992 1992 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध त्याने प्रथम कसोटी सामना खेळला आणि 103 धावा केल्या होत्या. सामन्याच्या पहिल्या डावात सहाव्या क्रमांकावर फलंदाजी केली होती. सहवागने 2001 आफ्रिकाविरुद्ध पदार्पण केले आणि सहाव्या स्थानावर फलंदाजी करत 105 खेळला. रैनानेही 2010 मध्ये डेब्यू सामन्यात सहाव्या स्थानी फलंदाजी केली आणि 120 धावा केल्या होत्या. दुसरीकडे, रोहितला सलामी फलंदाज म्हणून टेस्ट क्रिकेटमध्ये मोठे यास मिळवले असले तरी त्याने 2013 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध खालच्या क्रमांकावर फलंदाजी केली आणि 177 धावा केल्या.
दरम्यान, सहवाग आणि रोहितने खालच्या स्थानावरून कसोटी डेब्यू केले असले तरी त्यांना कसोटीत सलामी फलंदाज म्हणून ओळखले जाते. सहवागने सलामी फलंदाज म्हणून टेस्ट क्रिकेटमध्ये तीन तिहेरी शतक केले आहेत. तर रोहितने मागील वर्षी दक्षिण आफ्रिकाविरुद्ध सलामी फलंदाज म्हणून पहिल्यांदा फलंदाजी केली. ज्यानंतर त्याने 3 शतकांसह एक दुहेरी शतक ठोकले.