RCB vs SRH, IPL 2020: सनरायझर्स हैदराबादने टॉस जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय, Playing XIमध्ये झाले 'हे' बदल
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि सनरायझर्स हैदराबाद (Photo Credit: File Image)

RCB vs SRH, IPL 2020: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore)आणि सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) यांच्यातील इंडियन प्रीमिअर लीगचा (Indian Premier League) 52वा सामना शारजाह क्रिकेट स्टेडियमवर थोड्याच वेळात सुरु होईल. आजच्या सामन्यात विजय मिळवून एकीकडे आरसीबी (RCB) प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याच्या निर्धारित असेल, तर हैदराबादचे लक्ष्य विजय मिळवून प्ले ऑफ स्थानासाठी आपली दावेदारी कायम ठेवण्याकडे असेल. आजच्या सामन्यात हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नरने (David Warner) टॉस जिंकला आणि पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आजचा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा आहे, अशा स्थितीत दोंघांनी प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल केले आहेत. बेंगलोरने या हंगामात चांगली कामगिरी केली असून त्यांनी आजवर 12 पैकी 7 सामने जिंकले आहेत. विराट-सेना गुणतालिकेत 14 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे, तर हैदराबादने 12 पैकी 5 सामन्यात विजय मिळवला आहे आणि ते 10 पॉईंट्ससह सातव्या स्थानावर आहे. (IPL 2020 Playoffs Scenario: अब आयेगा मजा! 3 प्ले ऑफ जागांसाठी 6 संघांमध्ये चुरशीची लढत, पाहा अंतिम-4ची समीकरणे)

आरसीबीने आजच्या सामन्यासाठी देल स्टेन आणि शिवम दुबे यांच्या जागी इसुरु उदान आणि नवदीप सैनी यांचा समावेश केला आहे. सैनीला मागील सामन्याला दुखतपटीमुळे मुकावे लागले होते. दुसरीकडे, हैदराबाद प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठा बदल झाला आहे. दुखापतीमुळे विजय शंकरला विश्रांती देण्यात आली असून त्याच्या जागी अब्दुल समदचा समावेश झाला आहे. रॉयल चॅलेंजर्स संघाला शेवटच्या दोन सामन्यात सलग पराभवाचा सामना करावा लागला आहे, तर सनरायझर्सने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध दमदार विजय मिळवला होता. हैदराबादचा अंतिम सामना 3 नोव्हेंबर रोजी मुंबई इंडियन्सशी होईल. दुसरीकडे, भारतीय रन मशीन विराटला आता हैदराबादविरुद्ध केवळ धावाच कराव्या लागणार नाहीत तर त्यांचा संघ विजयी होण्यासाठीही प्रयत्नशील राहावे लागेल.

पाहा आरसीबी आणि हैदराबाद प्लेइंग इलेव्हन

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर: देवदत्त पडिक्कल, जोश फिलीप, विराट कोहली (कॅप्टन) एबी डिव्हिलिअर्स, शिवम दुबे, गुरुकीरत सिंह, क्रिस मॉरिस, वॉशिंगटन सुंदर, नवदीप सैनी, ईसूरु उदाना आणि युजवेंद्र चहल.

सनरायझर्स हैदराबाद: डेविड वॉर्नर (कॅप्टन), रिद्धिमान साहा, मनीष पांडे, केन विलियम्सन, अभिषेक नायर, जेसन होल्डर, अब्दुल समद, राशिद खान, शहबाज नदीम, टी नटराजन आणि संदीप शर्मा.