Ravi Shastri And Gautam Gambhir (Photo Credit - X)

IND vs NZ 2nd Test 2024: सध्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 3 सामन्यांची कसोटी मालिका (IND vs NZ Test Series 202 सुरू आहे. शनिवारी पुण्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडने भारताचा 113 धावांनी पराभव करत इतिहास रचला. मागील दोन पराभवांसह, भारताचा देशांतर्गत वर्चस्वाचा विक्रम 4331 दिवसांनंतर मोडला. टीम इंडियाने 12 वर्षांनंतर मायदेशात कसोटी मालिका गमावली आहे. या लाजिरवाण्या पराभवाने चाहत्यांची मोठी निराशा झाली. किवी संघाकडून झालेल्या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांना टीकेला सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी गंभीरच्या समर्थनार्थ मोठं वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाले रवी शास्त्री?

भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी गंभीरचे समर्थन करताना सांगितले की, त्याची कोचिंग कारकीर्द नुकतीच सुरू झाली आहे आणि तो लवकरच त्याच्या चुकांमधून शिकेल. शास्त्री म्हणाले, 'न्यूझीलंडने दोन्ही कसोटीत भारताचा शानदार पराभव केला आहे. गंभीरने नुकताच पदभार स्वीकारला आहे. ज्या संघाचा चाहता वर्ग प्रचंड आहे, त्या संघाचा प्रशिक्षक बनणे सोपे नाही, पण तो लवकरच शिकेल. (हे देखील वाचा: IND vs NZ 2nd Test 2024: भारतामध्ये 'या' परदेशी संघांनी जिंकल्या आहेत कसोटी मालिका, यादीत पाकिस्तानचाही समावेश)

न्यूझीलंडचा ऐतिहासिक विजय

खरं तर, न्यूझीलंडने 69 वर्षांनंतर भारतात पहिली कसोटी मालिका जिंकून इतिहास रचला आहे. मिचेल सँटनरने पुणे कसोटीत 13 बळी घेत भारतीय फलंदाजांना अडचणीत आणले आणि किवींनी भारताला 245 धावांत गुंडाळले आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अजेय आघाडी घेतली. हा पराभव डिसेंबर 2012 नंतर घरच्या मैदानावर भारताचा पहिला कसोटी मालिका पराभव आहे, याआधी इंग्लंडने 2-1 ने मालिका जिंकली होती.

पराभवानंतर रोहित शर्मा काय म्हणाला?

पुणे कसोटीतील पराभवावर कर्णधार रोहित शर्मा म्हणाला, 'हे निराशाजनक आहे. आणि आम्हाला याची अपेक्षा नव्हती. आम्हाला श्रेय न्यूझीलंडला द्यावे लागेल कारण त्यांनी आमच्यापेक्षा चांगली कामगिरी केली. त्याच्या आव्हानाला प्रतिसाद देण्यात आम्ही अपयशी ठरलो.

शेवटचा शेवटचा सामना कधी?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेतील शेवटचा कसोटी सामना 1 नोव्हेंबरपासून मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. भारताला हा सामना कोणत्याही किंमतीत जिंकायचा आहे. या मालिकेनंतर लगेचच भारताला 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना व्हायचे आहे. 22 नोव्हेंबरपासून पर्थमध्ये बॉर्डर गावस्कर ट्रॉफीला सुरुवात होणार आहे.