रविवारी (29 जून 2025) सकाळी ओडिशातील पुरी येथील श्री गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी झाली, ज्यामध्ये किमान तीन भाविकांचा मृत्यू झाला. यासोबतच सुमारे 50 भाविक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे, ज्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जेव्हा भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी शुभद्रा यांच्या मूर्ती घेऊन जाणारे तीन रथ, जगन्नाथ मंदिरापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या श्री गुंडीचा मंदिराजवळून जात होते तेव्हा ही घटना घडली. रविवारी पहाटे 4.30 च्या सुमारास, पवित्र रथ श्री गुंडीचा मंदिरातून जात होता. यावेळी दर्शनासाठी मोठी गर्दी जमली होती. रथ जवळ येताच गर्दी वेगाने वाढू लागली. यावेळी काही लोक खाली पडले आणि चेंगराचेंगरी झाली. या घटनेत तीन जणांचा जागीच मृत्यू झाला.
रथयात्रेदरम्यान, भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी शुभद्रा यांच्या मूर्ती घेऊन जाणारे तीन भव्य रथ, भाविकांच्या प्रचंड गर्दीने ओढले जातात. पवित्र रथांना गुंडीचा मंदिरात नेले जाते. जगन्नाथ मंदिरात परतण्यापूर्वी तिन्ही देवता तिथे एक आठवडा घालवतात. (हेही वाचा: Himachal Cloudburst: हिमाचल प्रदेशमध्ये ढगफुटीमुळे पाच जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता)
Stampede at Jagannath Rath Yatra:
At least three persons were killed and around 50 others injured in a #stampede that took place near Shree Gundicha Temple in Odisha's Puri on Sunday, a senior official said. pic.twitter.com/kQes73cKHV
— Deccan Chronicle (@DeccanChronicle) June 29, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)