शेअर बाजारातील कथित फसवणुकीप्रकरणी, आपल्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचा आदेश रद्द करावा, यासाठी सेबीच्या माजी प्रमुख माधबी पुरी बुच आणि इतर पाच जणांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सेबीच्या माजी प्रमुख आणि इतरांनी दाखल केलेल्या याचिकांवर मुंबई उच्च न्यायालय 4 मार्च रोजी सुनावणी करणार आहे. तोपर्यंत विशेष न्यायालयाच्या आदेशावर कोणतीही कारवाई करू नये, असे एसीबीला सांगण्यात आले आहे. याआधी मुंबईतील एका विशेष न्यायालयाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (एसीबी) शेअर बाजारातील कथित फसवणूक आणि नियामक उल्लंघनांसाठी, सेबीच्या माजी अध्यक्षा माधबी पुरी बुच आणि इतर पाच अधिकाऱ्यांविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे निर्देश दिले होते.
शनिवारी दिलेल्या आदेशात, मुंबईस्थित विशेष एसीबी न्यायालयाचे न्यायाधीश शशिकांत एकनाथराव बांगर म्हणाले, ‘प्रथमदर्शनी, नियामक त्रुटी आणि संगनमताचे पुरावे आहेत, ज्याची निष्पक्ष चौकशी आवश्यक आहे.’ त्यानंतर त्यांनी एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले. या आदेशाविरुद्ध माधबी पुरी बुच आणि इतरांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. हे प्रकरण न्यायमूर्ती एसजी डिगे यांच्यासमोर सादर करण्यात आले आणि उद्या त्यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात सहभागी असलेल्या सेबी अधिकाऱ्यांच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता उपस्थित राहिले. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) च्या दोन अधिकाऱ्यांची बाजू वरिष्ठ वकील अमित देसाई यांनी मांडली. हा खटला 1994 मध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये एका कंपनीच्या नोंदणीशी संबंधित आर्थिक फसवणूक आणि नियामक उल्लंघनाच्या आरोपांशी संबंधित आहे. (हेही वाचा: Man Suicide Due to Stock Market Loses: शेअर बाजारात 16 लाख रुपयांचे नुकसान; नाशिकमधील 28 वर्षीय तरुणाची आत्महत्या)
सेबीच्या माजी प्रमुख माधबी पुरी बुच आणि इतरांना तूर्तास दिलासा-
Bombay HC agrees to grant urgent hearing to #SEBI, BSE’s plea against FIR order in Cals Refineries case. High Court issues oral directions restraining registration of FIR till hearing of plea on March 4
Alert: ACB Court had directed registration of FIR against Madhabi Puri Buch,… pic.twitter.com/s6mIaf7H3Z
— CNBC-TV18 (@CNBCTV18Live) March 3, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)