
Man Suicide Due to Stock Market Loses: सध्या शेअर बाजार (Stock Market) प्रचंड कोसळला असून त्यांचा गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान होत आहे. शेअर बाजारातील नुकसानामुळे एका तरुणाने स्वत:चं जीवन संपवल्याचं समोर आलं आहे. नाशिक (Nashik) येथील एका 28 वर्षीय तरुणाने शेअर बाजारात 16 लाख रुपयांचे नुकसान झाल्याने बुधवारी आत्महत्या (Suicide) केली. राजेंद्र कोल्हे, असं या तरुणाचं नाव आहे. तो नाशिकमधील एका प्रसिद्ध विमा कंपनीत नोकरी करत होता आणि त्याने शेअर मार्केटमध्ये मोठी गुंतवणूक केली होती.
सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी त्र्यंबकेश्वर मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर पिंपळगाव येथील एका मैदानाजवळ या तरुणाने हे टोकाचे पाऊल उचलले. गावकऱ्यांनी त्याला जिल्हा रुग्णालयात नेले. परंतु, राजेंद्र कोल्हेचा मृत्यू झाला. पोलिसांनी वर्तवलेल्या प्राथमिक अंदाजानुसार, राजेंद्र आर्थिक अडचणींमुळे अस्वस्थ होता ज्यामुळे त्याने आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं. (हेही वाचा - Manav Sharma Suicide Case: आग्र्यात पत्नीच्या छळाला कंटाळून IT कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या; मृत्यूपूर्वी लाईव्ह व्हिडिओ रेकॉर्ड करून सांगितली व्यथा)
सातपूर पोलिस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, या प्रकरणावर अधिक स्पष्टता मिळविण्यासाठी आम्ही कुटुंबातील सदस्यांचे जबाब नोंदवणार आहोत. चांदवड तालुक्यातील रहिवासी असलेला कोल्हे हा कामानिमित्त नाशिक शहरात गेला होता. तो तेथे त्याच्या मोठ्या भावासोबत राहत होता. सातपूर स्टेशन पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. (हेही वाचा - Atul Subhash Suicide Case: अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणी पत्नी निकिता आणि सासरच्यांना जामीन मंजूर)
शेअर बाजारात घसरण -
दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून शेअर बाजारातील घसरण थांबण्याचे नाव घेत नाहीये. गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये बुडाले आहेत. 1996 नंतर पहिल्यांदाच निफ्टी सलग 5 महिन्यांपासून घसरण नोंदवत आहे. याचा अर्थ निफ्टीने 29 वर्षांतील सर्वात वाईट कामगिरी केली आहे. सप्टेंबर महिन्यात, निफ्टी त्याच्या 26,277.35 या सर्वकालीन उच्चांकावरून 16% किंवा 4,150 अंकांनी घसरला आहे. परदेशी गुंतवणूकदारांकडून होणारी विक्री, डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या टॅरिफची घोषणा, भारतीय कंपन्यांचे कमकुवत निकाल आणि मंदावलेली अर्थव्यवस्था याचा शेअर बाजारावर परिणाम होत आहे. (World Suicide Prevention Day 2020: आत्महत्येचा विचार, नैराश्य यामधून आत्महत्या सारखं टोकाचं पाऊल उचलण्याआधी एकदा या Suicide Prevention Helplines वर संपर्क करा)
आत्महत्या प्रतिबंध आणि मानसिक आरोग्य हेल्पलाइन क्रमांक:
टेली मानस (आरोग्य मंत्रालय): 14416 किंवा 1800 891 4416; निमहंस: + ९१ + 91 80 26995000 /5100 /5200 /5300 /5400; पीक माइंड: 080-456 87786; वांद्रेवाला फाउंडेशन: – 9999 666 555; अर्पिता आत्महत्या प्रतिबंध हेल्पलाइन: 080-23655557; आयकॉल: 022-25521111 आणि 9152987821 आणि 9152987821; सीओओजे मेंटल हेल्थ फाउंडेशन (सीओओजे): 0832-2252525.