Himachal Cloudburst: हिमाचल प्रदेशमध्ये ढगफुटीमुळे पाच जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता (Video)
हिमाचल प्रदेशमध्ये ढगफुटीची परिस्थीती निर्माण झाली आहे. तेथे बचावकार्य राबवण्यात येत आहे. बेपत्ता लोकांचा शोध सुरू आहे. धर्मशाला आणि कुल्लूमध्ये पाच ठिकाणी ढगफुटी आहे.
Himachal Cloudburst: हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे (Cloudburst in Himachal Pradesh) मोठे नुकसान झाले आहे. अनेक नागरिकींची घरे उध्वस्त झाली आहेत. मृतांचा आकडा पाच असल्याचे सांगितले जात आहे. तर अनेक लोक बेपत्ता असल्याचेही सांगितले जात आहे. नद्याच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे पूरस्थिती (floods) निर्माण झाली आहे. मोठ्या प्रमाणात झाडे उन्मळून पडली आहेत. धर्मशाला आणि कुल्लूमध्ये पाच ठिकाणी ढगफुटी झाली. बकरथाचमध्ये अडकलेल्या 50 पर्यटकांना सुरक्षितपणे वाचवण्यात आले आहे.
अनेक छोटे पूल पाण्याखाली गेलेत. एक वीज प्रकल्प वाहून गेला आहे. हवामान केंद्र शिमलाने आज गुरुवारी हिमाचलमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. 27,28, 29, 1 आणि 2 जुलै रोजीही यलो अलर्ट जारी केला आहे. 29 आणि 30 जून रोजी राज्यात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. हवामान खात्याने आज चंबा, कांगडा, मंडी, शिमला आणि सिरमौर या पाच जिल्ह्यांतील काही भागात पूरस्थितीचा इशाराही जारी केला आहे.
#WATCH | Flash flood fury in Dharamshala after cloudburst in Himachal Pradesh#HimachalPradesh #Floods #Rainfall #CloudBurst #viralvideo pic.twitter.com/JrTAKEprsm
— TIMES NOW (@TimesNow) June 26, 2025
गेल्या 24 तासांत पालमपूरमध्ये 76.6 मिमी, बंजरमध्ये 75.4, बॅरेजमध्ये 55.0, धर्मशालामध्ये 40.1, नारकंडामध्ये 39.0, शिलारूमध्ये 33.6, चंबामध्ये 32.0, उनामध्ये 30.6, सराहनमध्ये 28.4, बैजनाथमध्ये 28.0, अंबमध्ये 26.0 आणि रामपूरमध्ये 25.0 मिमी पाऊस पडला.
(The above story first appeared on LatestLY on Jun 26, 2025 04:34 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

