भारतातील सर्वात मोठी डोमेस्टिक क्रिकेट स्पर्धा रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) 2019-20 च्या अंतिम सामन्यात सौराष्ट्रने (Saurashtra) बंगालचा (Bengal) पराभव केला आणि पहिल्यांदा रणजीचे जेतेपद जिंकले. मागील वर्षी सौराष्ट्रला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. सौराष्ट्रला आजवर 3 वेळा उपविजेतेपद मिळाले आहेत. सौराष्ट्रने सामन्यात पहिले फलंदाजी केली आणि पहिल्या डावात 425 धावा केल्या. सौराष्ट्रकडून अर्पित वासवडा (Arpit Vasavad) 101, विश्वराज जडेजा आणि अवि बरोटनी प्रत्येकी 54 आणि चेतेश्वर पुजाराने 66 धावा केल्या. प्रत्युत्तरात बंगालचा संघ पहिल्या डावात 381 धावनावर ऑलआऊट झाला आणि सौराष्ट्रला पहिल्या डावाच्या आधारावर 44 धावांची आघाडी मिळाली. अंतिम सामना बरोबरी राहिला पण, पहिल्या डावाच्या आधारावर सौराष्ट्रने पहिले जेतेपद जिंकले. दुसऱ्या डावात फलंदाजी करत सौराष्ट्रने 105 धावांवर 4 गडी गमावले. (बंगालविरुद्ध रणजी ट्रॉफी फायनल सामन्यात जयदेव उनाडकटचा सुटला स्वतःवरचा ताबा, रागाच्या भरात तोडला स्टंप Video)
पहिल्या डावात बंगालकडून आकाश दीप 4, शाहबाज अहमद 3, मुकेश कुमारने 2 आणि ईशान पोरेलने 1 गडी बाद केला. त्याचबरोबर पहिल्या डावात बंगालचा संघ 161 ओव्हर फलंदाजी करताना 381 धावा करू शकला आणि सौराष्ट्रच्या पहिल्या डावात 44 धावांनी मागे पडला. याचा परिणाम संघाला पराभवाचा सामना करावा लागला. दोन्ही संघांनी अतिशय संथ फलंदाजी केली आणि म्हणूनच पाचव्या दिवसापर्यंत पहिला डाव सुरू होता. रणजी करंडक सामना ड्रॉ होत नाही आणि पहिल्या डावातील आघाडीच्या आधारे विजयी-पराभव किंवा गुण दिले जातात. अंतिम सामन्यातही बंगाल पहिल्या डावात सौराष्ट्राच्या 44 धावांनी मागे पडला आणि म्हणूनच त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
And this beautiful legend Trophy comes to the homeland of Legendary Jam Ranji. Kudos Saurashtrians. @BCCIdomestic @BCCI #cricket @JUnadkat @imjadeja @cheteshwar1 @ShelJackson27 @appy_vasavada pic.twitter.com/omHNOosT9f
— Saurashtra Cricket (@saucricket) March 13, 2020
1950-51 च्या हंगामात सौराष्ट्र संघाने पहिल्यांदा रणजी स्पर्धेत भाग घेतला आणि तब्बल 70 वर्षानंतर त्यांनी पहिले जेतेपद जिंकले. सौराष्ट्रचा कर्णधार उनाडकटने संघासाठी शानदार प्रदर्शन केले. या हंगामात उनादकटने 10 सामन्यांच्या 16 डावात सर्वाधिक 67 विकेट्स घेतल्या आहेत. यावेळी त्याने सात डावांमध्ये पाच किंवा अधिक विकेट आणि तीन डावांमध्ये 10 किंवा अधिक विकेट्स घेतल्या आहेत. उनाडकाटची सर्वोत्कृष्ट कामगिरी 106 धावांवर 12 गडी आहे.