File Image | Sachin Tendulkar (Photo Credits: PTI)

Pulwama Terror Attack: जैश-ए-मोहम्मद (Jaish-e-Mohammad ) या दहशतवादी संघटनेने 14 फेब्रुवारीच्या दुपारी सुमारे 350 किलोच्या स्फोटकांचा ट्र्क घुसवून CRPF च्या बसवर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये 40 हून अधिक जवान ठार झाले आणि काही जखमींवर रूग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या भ्याड दहशतवादीचा हल्ल्याचा बदला घेतला जाईल असं म्हणत सीआरपीएफने (CRPF) देखील शहीदांना आदरांजली दिली आहे. कलाकार, राजकारणींसह समाजातील प्रत्येक स्तरातून पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात आला आहे. खासदार आणि क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यानेदेखील ट्विटरच्या माध्यामातून या हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे.

सचिन तेंडुलकर याचे ट्विट

ट्विटरच्या माध्यमातून भावना मोकळ्या करताना पुलवामा हल्ल्याचा निषेध सचिन तेंडुलकरने 'भ्याड, 'धूर्त' आणि 'अर्थहीन' या शब्दात केला आहे. 'आपल्या प्रियजणांना ज्यांनी गमावलं आहे त्यांच्यासाठी जीव तुटतो' अशा शब्दांत त्याने आपण शहीदांच्या कुटुंबीयांसोबत असल्याचं म्हटलं आहे. तसेच सीआरपीएफच्या जवानांच्या कार्याला, सेवेला सलाम केला आहे. Pulwama Terror Attack: पुलवामा येथील भ्याड हल्ल्याप्रकरणी रोहित शर्मा, विराट कोहली यांच्यासह अनेक खेळाडूंनी ट्विट करत व्यक्त केल्या भावना

पुलवामा हल्ल्यामध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये महाराष्ट्रातील दोन सुपुत्रांचादेखील समावेश आहे. महाराष्ट्र सरकारने त्यांच्या कुटुंबीयांना 50 लाखाची मदत जाहीर केली आहे.