Live Cricket Streaming of PNG vs NAM 2nd T20I 2019 Online: पापुआ न्यू गिनी विरुद्ध नामिबिया टी-20 लाईव्ह सामना आणि स्कोर
नामिबिया क्रिकेट संघ (Photo Credits: Getty Images)

पापुआ न्यू गिनी आणि नामिबिया या संघात दोन साम्यांची टी-20 मालिका खेळली जात आहे. पापुआ न्यू गिनी विरुद्ध नामिबिया, दुसरा टी-20 सामना आज, 25 सप्टेंबर रोजी खेळला जाईल. दोन्ही संघातील हा सामना यूएसए मध्ये खेळला जात आहे. टी-20 क्रिकेट मालिका आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग 2 2019-22 नंतर येत आहे, ज्याची सुरवात 23 सप्टेंबर रोजी, शनिवारी झाली. नामिबिया आणि पापुआ न्यू गिनी आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप लीग 2019 चा भाग होते. नामीबियाने पॉइंट टेबलवर दुसर्‍या स्थानावर आपली मोहीम संपविली, तर पापुआ न्यू गिनीला वनडे स्पर्धेत एकही विजय मिळवता आला नाही आणि ते शेवटच्या स्थानावर राहिले. आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग 2 च्या अंतिम सामन्यात नामिबिया आणि पापुआ न्यू गिनी यांनी एकमेकांशी झुंज दिली, जिथे नामिबियाने 27 धावांनी विजय मिळविला.

पीएनजी विरुद्ध एनएएम दुसरा टी-20 आय सामना कधी पहायचा? जाणून घ्यातारीख, वेळ आणि ठिकाण

नामीबिया विरुद्ध पापुआ न्यू गिनी दुसरा सामना यूएसएमध्ये खेळला जाईल. हा सामना फ्लोरिडाच्या लॉडरहिलमधील सेंट्रल ब्रोवर्ड रीजनल पार्क स्टेडियम टर्फ ग्राऊंडवर खेळला जाईल. सामना भारतीय वेळेनुसार रात्री 11 वाजता सुरु होईल.

पीएनजी विरुद्ध एनएएम दुसरा टी-20 सामन्याचे थेट प्रसारण कसे पहावे? टीव्ही चॅनेल आणि प्रसारण

दुर्दैवाने, पीएनजी विरुद्ध एनएएम दुसरा टी-20 मॅचचे थेट प्रक्षेपण होणार नाही. पण, चाहते क्रिकेट पीएनजीच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून गेमचा थेट व्हिडिओ स्ट्रीम करू शकतात.

पीएनजी विरुद्ध एनएएम दुसरा टी-20 सामन्याचे विनामूल्य थेट लाईव्ह ऑनलाइन कोठे मिळवायचे? तसेच, विनामूल्य थेट क्रिकेट स्कोअर कोठे पाहावा

या मॅचच लाईव्ह स्ट्रीमिंग साठी उपलब्ध होणार नाही. तथापि, चाहते सामन्याचे थेट स्कोरकार्ड जाणून घेण्यासाठी LatestLY ला फॉलो करू शकतात.

नामिबियापुढे पापुआ न्यू गिनी बर्‍यापैकी कमकुवत आहेत. आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग 2च्या दरम्यान पीएनजीला एकही सामना जिंकता आला नाही आणि त्यांनी खेळलेले सर्व सामने त्यांनी गमावले.