PAK vs AUS, ICC T20 World Cup 2021: आयसीसी स्पर्धेच्या बाद फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) पराभवाचा बदला घेण्यासाठी बाबर आजमच्या नेतृत्वात पाकिस्तान (Pakistan) संघ सज्ज झाला आहे. आज संध्याकाळी दुबई (Dubai) आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आयसीसी टी-20 विश्वचषक (ICC T20 World Cup) 2021 च्या दुसऱ्या सेमीफायनल सामन्यात दोन्ही संघ एकमेकांशी भिडतील. या सामन्यापूर्वी संघाचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) आणि अनुभवी शोएब मलिक (Shoaib Malik) यांना फ्लू झाल्यामुळे त्यांनी सामन्याच्या एक दिवसापूर्वी झालेल्या सराव सत्रातही भाग घेतला नव्हता. त्यामुळे पाकिस्तान शिबिराला मोठा धक्का बसला होता. मात्र सामना सुरू होण्याआधीच पाकिस्तान संघाला आनंदाची बातमी मिळाली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध महत्त्वाच्या सामन्यासाठी संघातील हे दोन्ही स्टार खेळाडूंना तंदुरुस्त घोषित करण्यात आले असून ते आता या सामन्यात खेळण्यासाठी उपलब्ध आहेत. (PAK vs AUS, T20 World Cup 2021: सेमीफायनलपूर्वी पाकिस्तानसाठी वाईट बातमी, शोएब मलिक-मोहम्मद रिझवान यांना Flu)
पाकिस्तान क्रिकेट बोर्डच्या वैद्यकीय पॅनेलने गुरुवारी रिझवान आणि अष्टपैलू मलिक यांना दुबईत ऑस्ट्रेलिया विरुद्ध आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषकातील दुसरा उपांत्य सामना खेळण्यासाठी तंदुरुस्त घोषित केले. रिझवान आणि मलिक दोघेही सौम्य फ्लूमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध T20 विश्वचषक उपांत्य फेरीच्या एक दिवस आधी सरावाला मुकले होते. दोन्ही खेळाडूंची कोविड-19 साठी चाचणी करण्यात आली आणि त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला होता. उल्लेखनीय आहे की रिझवान आणि मलिक यांनी या स्पर्धेत पाकिस्तानसाठी अविभाज्य भूमिका बजावली आहे. कर्णधार बाबर आजमनंतर 214 धावा करणारा रिझवान संघासाठी सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज आहे. बाबरसोबत त्याची सलामीची भागीदारी आणि यष्टींमागील त्याची भूमिका हे पाकिस्तानने सुपर 12 चे सर्व सामने जिंकण्यात प्रमुख घटक आहेत.
Wicketkeeper Mohammad Rizwan and all-rounder Shoaib Malik have cleared the fitness test and will be available for the semi-final, today, against Australia ✅#PAKvAUS #T20WorldCup pic.twitter.com/dkqVQZD9G2
— Cricket Pakistan (@cricketpakcompk) November 11, 2021
दरम्यान, आसिफ अलीसह मलिक सामना पाकिस्तानच्या पारड्यात टाकण्यासाठी महत्त्वाचा खेळाडू ठरला आहे. स्कॉटलंडविरुद्ध मलिकने स्पर्धेतील संयुक्त-जलद अर्धशतक झळकावले, जे कोणत्याही टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात कोणत्याही पाकिस्तान फलंदाजाने केले सर्वात जलद अर्धशतक देखील आहे. लक्षात घ्यायचे की पाकिस्तान स्पर्धेच्या सुपर 12 टप्प्यात अपराजित राहिला आहे. त्यांनी भारत, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, नामिबिया आणि स्कॉटलंडला पराभूत केले.