On This Day, November 14, 2013! निवृत्तीची 6 वर्षे, आजच्या दिवशी सचिन तेंडुलकर याने खेळला होता अखेरचा टेस्ट
सचिन तेंडुलकर (Photo Credit: Getty Images)

लोकांसाठी जिंकणारा, आपल्या देशातील लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांच्या चाहत्यांशी खेळणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) अजूनही प्रत्येकाच्या हृदयात जागा आहे. सचिन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 24 वर्ष इतके शानदारपणे जगला की क्रिकेट इतिहासाचा प्रत्येक क्षण अमर बनला. सर्वप्रथम वनडे (ODI) क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर सचिनने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. सचिनला संस्मरणीय निरोप देण्यासाठी बीसीसीआयने वेस्ट इंडिज (West Indies) संघाविरुद्ध सचिनसाठी टेस्ट मालिका आयोजित केली. सचिनने 14 नोव्हेंबरला विंडीज विरुद्ध शेवटची कसोटी खेळली होती आणि आज सचिनच्या निवृत्तीला 6 वर्षे पूर्ण झाली आहेत. असा एक काळ होता जेव्हा वयाच्या 12 व्या वर्षी सचिन सामना खेळला आणि सलग 55 दिवस सराव करायचा. लवकरच त्याला मुंबईच्या रणजी संघात स्थान मिळाले. त्यावेळी घरगुती क्रिकेटमध्ये मुंबईचे वर्चस्व होते. मुंबई (Mumbai) रणजी चॅम्पियन होता आणि अवघ्या 12 व्या वर्षी चॅम्पियन संघाचा एक भाग होणं ही एक मोठी कामगिरी होती. सचिनने गुजरातविरुद्ध पहिल्या रणजीमध्ये शतक झळकावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

आपल्या समर्पणाने आणि कष्टाने सचिनने टीम इंडियामध्ये स्थान मिळविले. 1989 मध्ये पाकिस्तान (Pakistan) दौऱ्यासाठी सचिनचा संघात समावेश करण्यात आला होता. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर सचिनने स्वत:ला सिद्ध करण्यास फारसा वेळ घेतला नाही. वयाच्या 17 व्या वर्षी ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर 14 ऑगस्ट 1990 इंग्लंडविरुद्ध कसोटीत त्याने पहिले शतक झळकावले. मग सचिन खेळत राहिला आणि आज सचिन शतकांचा विक्रम करत राहिला. टीम इंडियाकडे एक फलंदाज होता जो सामन्याची भूमिका स्वत: हून बदलू शकत होता. सचिनच्या आंतरराष्ट्रीय टेस्ट कारकीदीत सर्वात विशेष गोष्ट म्हणजे 15 नोव्हेंबरला त्याच्या कसोटी क्रिकेटची सुरुवात झाली आणि 14-16 नोव्हेंबरदरम्यान झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्ध टेस्ट सामन्यात सचिन 15 नोव्हेंबरला अंतिम वेळा फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता.

24 वर्षाच्या कारकिर्दीत सचिनने 200 टेस्ट सामन्यात 53.78 च्या सरासरीने 15,921 धावा केल्या आहेत. यात 51 शतक आणि 68 अर्धशतकांचा समावेश आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात सचिनने 74 धावा केल्या आणि आपला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा  थांबवला. सचिनने पारदर्पण आणि निवृत्तीच्या अंतिम टेस्ट सामन्यात दुसऱ्या डावात फलंदाजी केली नाही. टीम इंडियाने पहिल्या डावात 495 धावा केल्या आणि यामुळे दुसऱ्या डावात त्यांना फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही.