Video: फलंदाजाने मारलेल्या दमदार शॉटवर डोकं वाचवण्याच्या प्रयत्नात तुटले गोलंदाजाच्या हाताचे हाड, पहा
(Photo Credit: Twitter)

क्रिकेटमध्ये खेळाडूच्या सुरक्षेचा विजय सध्या चर्चेचा विषय बनला आहे. मैदानावर असे अनेक प्रसंग घडले आहेत ज्यामुळे खेळाडूचे प्राण धोक्यात पडले आहे. नुकतेच अ‍ॅशेस मालिकेच्या एका मॅचदरम्यान ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथ याला जोफ्रा आर्चर याचा चेंडू लागल्याने मानेला दुखापत झाली ज्यामुळे तो जागीच कोसळला. त्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून काही कडक नियमांची अंमलबजावणी करण्यात आली. दरम्यान रविवारी आणखी एक ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूसोबत असा प्रकार घडला. हा प्रसंग सर्वांच्या मनात धडकी भरणारा होता. या मॅचमध्ये गोलंदाजाचा जीव थोडक्यात वाचला. cricket.com.au ने ट्विटरवर या प्रसंगाचा व्हिडिओ शेअर केला आहे आणि तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (स्टीव्ह स्मिथ च्या Ashes मधील जबरदस्त फॉर्मवर सचिन तेंडुलकर ने केले रिसर्च, 3 मिनिटांच्या व्हिडीओमध्ये केला उलगडा Video)

ऑस्ट्रेलियाच्या सध्याच्या घरगुती क्रिकेट हंगामात, न्यू साउथ वेल्स आणि क्वीन्सलँड यांच्यातील वनडे मॅचदरम्यान गोलंदाज मिकी एडवर्ड्स याच्या हाताचे हाड तुटले. क्वीन्सलँडचा फलंदाज सॅम्युअल हेझलेट याने मिकीच्या चेंडूवर जबरदस्त सरळ शॉट मारला. हेझलेटचा हा शॉट थेट मिकीच्या तोंडावर आला आणि त्याने आपला हात पुढे करून स्वत: ला वाचवले. पण, या प्रयत्नात मिकीच्या हाताचे हात तुटले. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मिकीच्या दुखापतीबद्दल नंतर सांगितले की तो ठीक आहे. झाले असे की, सॅम्युएलच्या शॉटपासून बचाव करताना मिकी खेळपट्टीवर पडला आणि यादरम्यान त्याच्या शरीराचे वजन एका बोटावर पडले आणि ती तुटली.

या सामन्याबद्दल बोलले तर, या सामन्यात क्वीन्सलँडने न्यू साउथ वेल्सचा सहज पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना न्यू साउथ वेल्सने निर्धारित 50 षटकांत 5 गडी गमावून 305 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करत क्वीन्सलँडने 12 चेंडू आणि 4 गडी राखून विजय मिळविला. क्वीन्सलँडकडून हिसलेटने 70 हून अधिक धावा केल्या. त्याच्या व्यतिरिक्त मार्नस लब्युचेनने 67 धावा केल्या.