मोहम्मद सिराज (Photo Credit: Twitter)

टीम इंडियामध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळणारे काही खेळाडू सध्या भारत ए (India A) संघाकडून न्यूझीलंड इलेव्हन (New Zealand XI) विरुद्ध तीन वनडे सामन्यांची मालिका खेळत आहे. भारत अ संघाने पहिल्या अनधिकृत सामन्यात न्यूझीलंड एला 5 विकेटने सहज पराभूत केले. संघासाठी गोलंदाजांनी प्रथम शानदार प्रदर्शन केले आणि त्यानंतर फलंदाजांनी स्फोटक डाव खेळला आणि 30 व्या ओव्हरमधेच विजय मिळविला. या सामन्यात वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) याने भारताकडून सर्वाधिक 3 फलंदाज बाद केले. या दरम्यान सिराजने दोन फलंदाजांना बोल्ड केले, तर एकाला त्याने कॅच आऊट केले. सिराजने दोन धोकादायक चेंडूंवर गडी बाद केले. सामन्यादरम्यान फक्त एकदाच नव्हे तर 2 वेळा सिराजने फलंदाजांची दांडी गुल केली. पहिले फलंदाजीसाठी आलेला न्यूझीलंड अ संघ 230 धावांवर ऑलआऊट झाला. सिराजने न्यूझीलंड इलेव्हनच्या एजाज पटेल (Ajaz Patel) आणि जेकब डफी (Jacob Duffy) यांना ज्या प्रकारे बाद केले त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. (IND vs NZ: पृथ्वी शॉ, संजू सॅमसन यांचा वेगवान डाव; न्यूझीलंडविरुद्ध भारत अ संघाने 5 विकेटने विजय नोंदवत मालिकेत घेतली आघाडी)

पटेलला टाकलेल्या चेंडूवर सिराजने सरळ मधला स्टंप उखडला. स्टंप फक्त उखडला नाही तर हवेत उडताना दिसला. त्यानंतरत्याने ऑफ स्टम्पवर याकूबला चेंडू टाकला आणि ऑफ स्टंपही अशाच प्रकारे हवेत उडताना दिसला. या सामन्यात सिराजने 6.3 ओव्हरमध्ये 33 धावा देऊन 3 विकेट घेतल्या. त्याने सलामी फलंदाज जॉर्ज वर्करलाही बाद केले. वर्करने 21 चेंडूत 14 धावा केल्या. पाहा हा व्हिडिओ:

विजयासाठी 231 धावांचा पाठलाग करताना भारत असाठी पृथ्वी शॉ आणि मयंक अग्रवालने 79 धावांची भागीदारी करत शानदार सुरुवात मिळवून दिली. पृथ्वीने 35 चेंडूत48, तर मयंकने 29 चेंडूत तितक्याच धाव केल्या. त्यानंतर सलग दोन विकेट गमावलेल्या भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिल आणि संजय सॅमसन यांनी तिसर्‍या विकेटसाठी 66 धावांची भर घालून भारताला आवश्यक असलेला आत्मविश्वास मिळवून दिला. सुर्यकुमार यादवने 19 चेंडूत 35 धावा फटकावल्या. भारताकडून सिराजने सर्वाधिक तीन, तर खलील अहमद आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी दोन आणि विजय शंकर-राहुल चाहरने प्रत्येकी एक गडी बाद केला.