भारतीय क्रिकेट संघ (Indian Team) वर्षाच्या पहिल्या परदेश दौर्यासाठी न्यूझीलंडला पोहोचला आहे. टीम इंडियाचे काही खेळाडू यापूर्वी न्यूझीलंडमध्ये दाखल झाले आहेत आणि भारत अच्या वतीने मालिकेसाठी तयारी करत आहेत. बुधवारी लिंकन (Lincoln) येथील पहिल्या अनधिकृत वनडे सामन्यात भारत अ (India A) संघाने न्यूझीलंड अ (New Zealand A) संघाविरुद्ध पाच गडी राखून विजय मिळविला. न्यूझीलंडविरुद्ध शिखर धवनच्या जागी भारताच्या वनडे संघात वर्णी लागल्याच्या दुसर्या दिवशी, 20 वर्षीय सलामी फलंदाज पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याने 35 चेंडूत 48 धावा फटकावत संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली. भारताच्या टी-20 संघात धवनच्या जागी स्थान मिळविणारा विकेटकीपर संजू सॅमसन (Sanju Samson) याने 21 चेंडूत 39 धावा केल्या, तर सूर्यकुमार यादवने केवळ 19 चेंडूत 35 धावा फटकावल्या. भारत अ संघाने विजयासह तीन सामन्यांची अनधिकृत वनडे मालिका सुरू केली. न्यूझीलंड ए विरुद्ध पहिला सामना 5 विकेट्सने जिंकत आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. (IND vs NZ T20I 2020: सर्वाधिक षटकार, सर्वोच्च वैयक्तिक धावा; भारत-न्यूझीलंडमधील 'हे' प्रमुख 5 टी-20 रेकॉर्डस् जाणून घ्या)
मोहम्मद सिराजची शानदार गोलंदाजीनंतर पृथ्वी आणि सॅमसनच्या उत्कृष्ट खेळीमुळे संघाला सहज विजय मिळाला. पहिले फलंदाजी करत न्यूझीलंड अ संघ 230 धावांवर ऑलआऊट झाला. न्यूझीलंड संघासाठी रचीन रविंद्रने सर्वाधिक 49 धावा केल्या. कर्णधार टॉम बॉयसने 47 धावांची खेळी केली. सिराजने 6.3 ओव्हरमध्ये 33 धावा देऊन तीन, तर खलील अहमद आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. न्यूझीलंडविरूद्ध टी-20 आणि वनडे मालिकेत स्थान मिळवणारे सॅमसन आणि पृथ्वीने या सामन्यात शानदार फलंदाजी केली. पृथ्वीने 35 चेंडूत 3 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने 48 धावा फटकावल्या. सॅमसनने 21 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकारांसह 39 धावा केल्या. कर्णधार शुभमन गिल 30 धावांवर बाद झाला. विजय शंकरने 20 आणि क्रुणाल पांड्याने 13 धावा केल्या. दुसरा व तिसरा सामना शुक्रवार आणि शनिवारी ख्रिसचर्चमध्ये खेळला जाईल.
India A take the early series lead in Lincoln against New Zealand A. Prithvi Shaw leading the India A chase with 48. VIDEO scorecard | https://t.co/EZcuKEnCvE #NZAvINDA pic.twitter.com/4ufpef0l3A
— BLACKCAPS (@BLACKCAPS) January 22, 2020
टीम इंडियाचा नियमित सलामी फलंदाज शिखर जखमी झाल्यानंतर संजूला टी-20 आणि पृथ्वीला वनडेमध्ये पहिल्यांदा स्थान मिळाले. मंगळवारी न्यूझीलंड दौर्यावर खेळल्या जाणार्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली.