Virat Kohli Batting Struggle: विराट कोहलीच्या फलंदाजीत टेक्निकल फॉल्ट? इंग्लंड दौऱ्यापूर्वी भारतीय दिग्गज खेळाडूचे मोठे भाष्य
विराट कोहली (Photo Credit: PTI)

India Tour of England 2022: विराट कोहली (Virat Kohli) आगामी इंग्लंड मालिकेत (England Series) परदेशात मजबूत पुनरागमन करेल असा विश्वास भारताचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनला (Mohammad Azharuddin) व्यक्त केला आहे. कोहली एका खडतर पॅचमधून जात आहे आणि परिणामी, गेल्या काही वर्षांत त्याला जास्त धावा करता आल्या नाहीत. आयपीएलचा (IPL) 15 वा सीझन विराटसाठी खास ठरला नाही. त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरसाठी 16 सामन्यांमध्ये सुमारे 23 च्या सरासरीने एकूण 341 धावा केल्या. यादरम्यान तो तीनदा गोल्डन डकचा बळीही पडला. म्हणजेच तीन सामन्यांत त्याला पहिल्याच चेंडूवर पॅव्हिलियनमध्ये परतावे लागले. कोहलीला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या टी-20 मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. भारतीय संघ 1 जुलैपासून इंग्लंडमध्ये यजमानांविरुद्ध पाचवा कसोटी सामना खेळणार आहे, जो कोविडमुळे गेल्या वर्षी पुढे ढकलण्यात आला होता. (IND vs SL 1st Test: कसोटी सामन्यांत शतकाच्या उंबरठ्यावर अनेक दिग्गज 'नर्व्हस 90’ चे शिकार, विराट कोहली मात्र 12 वा भारतीय अपवाद)

“जेव्हा कोहलीने 50 धावा केल्या, असे दिसते की तो अयशस्वी झाला आहे, अर्थातच, त्याने यावर्षी फारसे काही केले नाही. प्रत्येकजण, अगदी सर्वोत्कृष्ट त्यांच्या कारकिर्दीत वाईट टप्प्यातून जात आहे. कोहली खूप क्रिकेट खेळत आहे आणि आता त्याला थोडा ब्रेक मिळाला आहे, आशा आहे की तो इंग्लंडमध्ये फॉर्ममध्ये परत येईल,” अझरुद्दीन म्हणाला. 33 वर्षीय फलंदाज आयपीएल 2022 च्या शेवटी लयीत परतला आणि त्याने काही चांगली खेळी खेळली. परंतु आरसीबीचा स्टार फलंदाज सातत्याने कामगिरी करण्यात अयशस्वी ठरला. त्याने आपली फलंदाजीची स्थिती देखील बदलली आणि डावाची सुरुवात करण्यासाठी बाहेर पडला, परंतु आरसीबीच्या माजी कर्णधारासाठी काही फरक पडला नाही.

“त्याच्या तंत्रात काहीही चूक नाही. कधी कधी तुम्हाला नशिबाचीही साथ हवी असते. जर त्याने एक मोठी धावसंख्या, मोठे शतक मिळवले तर आक्रमकता आणि आत्मविश्वास परत येईल,” अझहर पुढे म्हणाले. कोहलीने शतक ठोकून दोन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. त्याने कोलकाता येथील ईडन गार्डन्स येथे बांगलादेशविरुद्ध दिवस/रात्र कसोटीत शेवटचे आंतरराष्ट्रीय शतक झळकावले होते. यांनतर तो अनेकदा तरीहेरी धावसंख्येचा जवळ पोहोचला पण अपयशी ठरला.