भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याच्यासाठी 4 मार्चपासून श्रीलंकेविरुद्ध  (Sri Lanka) कसोटी सामना खूप खास असेल. विराट कोहली भारतासाठी 100 वा कसोटी सामना खेळणार आहे. भारतासाठी 100 वा कसोटी सामना खेळणारा 12वा खेळाडू आहे. कोहलीने 2011 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध पदार्पण केले होते. कोहलीपूर्वी भारतासाठी 100 कसोटी सामने खेळलेल्या खेळाडूंमध्ये सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, कपिल देव, सचिन तेंडुलकर, अनिल कुंबळे, राहुल द्रविड, सौरव गांगुली, व्हीव्हीएस लक्ष्मण, वीरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग आणि इशांत शर्मा यांचा समावेश आहे. पण असे अनेक दिग्गज खेळाडू आहेत जे कसोटी शतकाच्या उंबरठ्यावर होते आणि ‘नर्व्हस 90’चे शिकार बनले. (IND vs SL 1st Test: डेब्यू सामन्यात ‘कर्णधार’ रोहित शर्माचा नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजीचा निर्णय, पाहा प्लेइंग XI)

अर्जुन रणतुंगा, गॅरी सोबर्स, डेल स्टेन (93)

1990 च्या दशकातील दोन महान श्रीलंकेचे खेळाडू, अष्टपैलू खेळाडू अरविंदा डी सिल्वा आणि अर्जुन रणतुंगा या दोघांनी आयलँडर्ससाठी 93 कसोटी सामने खेळले. श्रीलंकेच्या पहिल्या विश्वचषकात मॅच-विनिंग खेळी खेळणाऱ्या डी सिल्वाने 1984 मध्ये लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण केले. तर श्रीलंकेचा विश्वचषक विजेता कर्णधार रणतुंगा यांनी 1982 मध्ये इंग्लंडविरुद्ध त्याच्या आगमनाची घोषणा केली. तसेच वेस्ट इंडिजचे महान क्रिकेटपटू गॅरी सोबर्स आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेन यांनीही 93 कसोटी सामने खेळले.

अॅडम गिलख्रिस्ट, रॉड मार्श आणि नासिर हुसेन (96)

आपल्या पिढीतील एक उत्कृष्ट यष्टीरक्षकांपैकी एक, रॉड मार्श यांनी 96 कसोटी सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले. मार्श यांनी 1970 मध्ये द गाबा येथे इंग्लंडविरुद्ध सामन्यातून पदार्पण केले. दिग्गज यष्टिरक्षकांबद्दल बोलायचे तर, ऑस्ट्रेलियाच्या अॅडम गिलख्रिस्टने 96 कसोटी सामन्यांत बॅगी ग्रीन्समध्ये आपला दम दाखवला. तर 96-क्लबमधील प्रतिष्ठित खेळाडूंमध्ये सामील होणारा इंग्लंडचे नासिर हुसेन देखील आहेत, जे कसोटी क्रिकेटमध्ये अनोखे शतक पूर्ण करण्याच्या जवळ आले होते.

कर्टली अ‍ॅम्ब्रोस (98)

दिग्गज वेगवान गोलंदाज कर्टली अ‍ॅम्ब्रोस त्यांच्या काळात आपल्या घातक गोलंदाजीने फलंदाजांमध्ये बीटी निर्माण करण्यास प्रसिद्ध होते. या महान वेगवान गोलंदाजाने 1988 मध्ये पाकिस्तानविरुद्ध बोर्डा येथे कसोटी पदार्पण केले. आणि वेस्ट इंडिजकडून 98 कसोटी सामने खेळले. अ‍ॅम्ब्रोस यांनी 2000 मध्ये इंग्लंडविरुद्ध अंतिम कसोटी खेळली.

मोहम्मद अझरुद्दीन (99)

मधल्या फळीतील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक, मोहम्मद अझरुद्दीन भारतासाठी 100 कसोटी सामने पूर्ण करण्यापासून एक पाऊल दूर होते. 50 षटकांच्या तीन विश्वचषकांमध्ये भारताचे नेतृत्व करणारा एकमेव कर्णधार अझहरने 99 कसोटी सामन्यांत 6215 धावा केल्या. माजी भारतीय कर्णधाराने 1984 मध्ये ईडन गार्डन्सवर इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण केले. विशेष म्हणजे अझरुद्दीनने भारतासाठी पहिल्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात शतके झळकावली.