KXIP vs SRH, IPL 2020: किंग्स इलेव्हन गोलंदाजांनी SRH च्या तोंडून हिरावला विजयाचा घास, रंगतदार सामन्यात 12 धावांनी पराभव करत लगावला विजयाचा चौकार
किंग्स इलेव्हन पंजाब (Photo Credit: Twitter/IPL)

KXIP vs SRH, IPL 2020: इंडियन प्रीमिअर लीगच्या (Indian Premier League) 43व्या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबने (Kings XI Punjab) दिलेल्या 127 धावांच्या प्रत्युत्तरात सनरायझर्स हैदराबादला (Sunrisers Hyderabad) 114 धावांपर्यंतच मजल मारता आली आणि पंजाबने 12 धावांनी सामना जिंकला. या सामन्यासह पंजाबने सलग चौथा विजय मिळवला. हैदराबादचा 11 सामन्यातील हा पाचवा विजय ठरला आणि ते 10 गुणांसह पॉईंट टेबलमध्ये पाचव्या स्थाना विराजमान झाले. हैदराबादसाठी लक्ष्याचा पाठलाग करताना कर्णधार डेविड वॉर्नरने 35, जॉनी बेअरस्टोने 19 मनीष पांडे 15 आणि विजय शंकरने 26 धावांचे योगदान दिले. दुसरीकडे, किंग्स इलेव्हनसाठी गोलंदाजांनी टीमच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली. हैदराबाद सामना जिंकेल असे दिसताना किंग्स इलेव्हन गोलंदाजांनी त्यांना सामन्यात पुनरागमन करून दिले आणि हैदराबादच्या तोंडून विजयाचा घास हिरावला. क्रिस जॉर्डन आणि अर्शदीप सिंह यांनी प्रत्येकी 3 तर मोहम्मद शमी, रवी बिश्नोई आणि मुरुगन अश्विन यांनी प्रत्येकी 1 विकेट काढली. (IPL 2020: मनदीप सिंहच्या वडिलांचं काल रात्री निधन झालं, पण तरीही आजच्या हैदराबादविरुद्ध मॅचमध्ये डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानात उतरला)

कर्णधार वॉर्नरने 20 चेंडूत 35 धावांची त्वरित खेळी केली आणि रवी बिश्नोईच्या चेंडूवर झेलबाद झाला. जॉनी बेअरस्टो अश्विनने 19 धावांवर बाद केले तर अब्दुल समद 7 धावा करून शमीचा शिकार बनला. त्यानंतर मनीष पांडे आणि विजय शंकरच्या जोडीने पुन्हा एकदा सनरायझर्सना विजय मिळवून दिला. मनीष आणि विजयने चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत संघाचा विजय निश्चित केला. मनीष पांडेने 29 चेंडूत 15 धावा केल्या.  विजय शंकरने 4 चौकाराच्या मदतीने 27 चेंडूत 26 धावा केल्या. पांडेने 15 धावा करून जॉर्डनचा शिकार बनला. विजयला अर्शदीप सिंहने 26 धावांवर माघारी पाठवले.

यापूर्वी आजच्या सामन्यात किंग्स इलेव्हनला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून 126 धावांपर्यंत मजल मारता आली. पंजाबसाठी निकोलस पूरनने सर्वाधिक नाबाद 32 धावांचा डाव खेळला. केएल राहुल 27 आणि क्रिस गेल 20 धावा करून परतले. राहुल आणि गेल यांना चांगली सुरुवात मिळाल्यानंतरही मोठी धावसंख्या उभारता आली नाही. दुसरीकडे, हैदराबादसाठी संदीप शर्मा, जेसन होल्डर आणि राशिद खान यांना प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या.