KXIP vs SRH, IPL 2020: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2020 च्या 43व्या सामन्यात आज किंग्ज इलेव्हन पंजाबचा (Kings XI Punjab) सामना सनरायझर्स हैदराबादशी (Sunrisers Hyderabad) आहे. आजच्या सामन्यात दोन्ही संघांना विजय मिळवणे गरजेचे असल्याने हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नरने टॉस जिंकून पंजाबला पहिले फलंदाजी करण्यास सांगितले. किंग्स इलेव्हनसाठी मयंक अग्रवालला (Mayank Agarwal) आजच्या सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली असल्याने कर्णधार केएल राहुल समवेत मनदीप सिंह (Mandeep Singh) सलामीला आला. शुक्रवारी रात्री मनदीपच्या वडिलांचे निधन झाले. अशा स्थितीत तो घरी जाण्याऐवजी संघासोबत युएई येथेच राहिला. क्रिकेटविषयी मनदीपची अशी भावना पाहून क्रिकेट चाहतेही त्याचे कौतुक करीत आहेत. 28 वर्षीय मनदीप सिंहने आज राहुलसह डावाची सुरुवात करत 14 चेंडूत 17 धावा केल्या. यामध्ये एका चौकाराचाही समावेश आहे. हैदराबादच्या मध्यमगती गोलंदाज संदीप शर्माच्या चेंडूवर मोठा शॉट लावण्याच्या प्रयत्नात बाऊंड्री लाइनवर मनदीप राशिद खानकडे झेलबाद झाला. (KXIP vs SRH, IPL 2020: सनरायझर्सच्या अचूक गोलंदाजीपुढे किंग्स इलेव्हन पंजाबच्या फलंदाजांची शरणागती, KXIP चे हैदराबादला विजयासाठी 127 धावांचे लक्ष्य)
दरम्यान, मनदीपच्या वडिलांना आदरांजली वाहण्यासाठी किंवा त्यांचा सन्मान करण्याच्या रूपात, किंग्स इलेव्हन पंजाब आज काळे आर्मबँड्स घालून मैदानावर उतरले आहेत. आयपीएलमध्ये एकदा अंतिम फेरी गाठलेल्या किंग्स इलेव्हनने नाणेफेक गमवली आणि प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल केले. मयंक अग्रवालच्या जागी मनदीप सिंह आणि जेम्स नीशम यांना बाहेर केले असून क्रिस जॉर्डनला संधी मिळाली आहे. दरम्यान, मनदीपचे वडिल अनेक दिवसांपासून आरोग्यासंबंधीच्या समस्यांना तोंड देत असल्याचे म्हटले जात आहे.
Lost his father last night, but Mandy’s out here to open! 🙌
Way to go, Mandy#SaddaPunjab #IPL2020 #KXIP #KXIPvSRH
— Kings XI Punjab (@lionsdenkxip) October 24, 2020
चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध (सीएसके) सामन्यात छोट्या कॅमिओसह फलंदाजाने त्याच्या मोहिमेस सकारात्मक सुरुवात केली. परंतु, त्यानंतर सामन्यांमध्ये त्याची पुनरावृत्ती करण्यात तो अपयशी ठरला आणि तीन सामन्यांनंतर त्याला वगळण्यात आले. मनदीप सिंगने आतापर्यंत 11 च्या सरासरीने 33 धावा केल्या आहेत. पंजाबचा क्रिकेटपटू कॅश-रिच लीगमधील एक अनुभवी प्रचारक आहे आणि या लीगमध्ये त्याचे 100 सामने खेळले आहेत. सलग तीन विजयानंतर केएल राहुल आणि टीमने प्ले ऑफ गाठण्याच्या आशा कायम ठेवली आहे आणि सध्या संघ सहाव्या स्थानावर आहे. 10 सामन्यांनंतर त्यांच्या नावे 8 गुण आहेत.