सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब (Photo Credit: PTI)

KXIP vs SRH, IPL 2020: सनरायझर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) टॉस जिंकून किंग्स इलेव्हन पंजाबला (Kings XI Punjab) पहिले फलंदाजी करण्यास सांगितले असताना हैदराबादच्या गोलंदाजांच्या अचूक माऱ्यासमोर पंजाबला 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 126 धावांपर्यंत मजल मारता आली. आयपीएल (IPL) प्ले ऑफच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या आजच्या सामन्यात किनगे इलेव्हन फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. पंजाबसाठी कर्णधार केएल राहुलने (KL Rahul) 27 धावा केल्या, क्रिस गेलने 20 आणि मनदीप सिंहने 17 धावांचे योगदान दिले. निकोलस पुरन (Nicholas Pooran) नाबाद 32 धावा करून परतला. किंग्स इलेव्हनचे आघाडीचे फलंदाज बाद झाल्यावर पुरने संयमी खेळ केला आणि पंजाबला शंभरी पार नेले. दुसरीकडे, सनरायझर्ससाठी संदीप शर्मा (Sandeep Sharma), जेसन होल्डर आणि राशिद खान (Rashid Khan) यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. आजच्या सामन्यात पराभूत झालेल्या टीमचा प्रवास संपुष्टात येईल. (IPL 2020: युएई येथील 13व्या हंगामात ‘हे’ 5 मॅच विनर खेळाडू ठरले फ्लॉप; एमएस धोनी, ग्लेन मॅक्सवेलसह दिग्गज खेळाडूंचा समावेश)

नाणेफेक गमावून पहिले फलंदाजी करताना पंजाबकडून सलामीची जबाबदारी केएल राहुल आणि मनदीप सिंह यांनी घेतली. पहिल्या 4 ओव्हरमध्ये दोघांनी 24 धावा केल्या, मात्र पाचव्या ओव्हरमधील अखेरच्या चेंडूवर मनदीप 14 चेंडूंत 17 धावा करून बाद झाला. गेलच्या रूपात पंजाबला दुसरा झटका बसला जो 20 चेंडूत 20 धावा करून होल्डरच्या चेंडूवर बाद झाला. कर्णधार राहुलच्या रूपात पंजाबला तिसरा धक्का बसला. राहुल राशिद खानच्या गुगलीवर 27 चेंडूत 27 धावांवर क्लीन बोल्ड झाला. ग्लेन मॅक्सवेलला बाद करून संदीप शर्माने पंजाबला आखीन एक धक्का दिला. संदीपने मॅक्सवेलला वैयक्तिक 12 धावांवरडेविड वॉर्नरकडे झेलबाद केले. दीपक हुडा भोपळाही न फोडता माघारी परतला. क्रिस जॉर्डनने 7 धावा करून होल्डरच्या चेंडूवर खालील अहमदकडे कॅच आऊट झाला.

आजच्या सामन्यात हैदराबादने एक बदल केला आहे. खलील अहमदला शाहबाज नदीमच्याऐवजी टीममध्ये संधी मिळाली आहे. तर पंजाबने मयंक अग्रवाल आणि जेम्स निशमच्या जागी मनदीप सिंह आणि क्रिस जॉर्डनचा समावेश केला आहे.