KL Rahul (Photo Credt - Twitter)

IND vs NZ 2nd Test KL Rahul: न्यूझीलंड विरुद्ध बेंगळुरू येथे खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील झाला. या मॅचमध्ये टीम इंडिया पहिल्या इनिंगमध्ये खराब फ्लॉप झाली आणि अवघ्या 46 रन्सवर ऑलआऊट झाली. या सामन्यात संघासाठी मधल्या फळीत फलंदाजी करणारा केएल राहुलही पूर्णपणे फ्लॉप असल्याचे दिसून आले. अशा परिस्थितीत केएल राहुलला न्यूझीलंडविरुद्ध पुण्यात होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यातून वगळले जाऊ शकते.

केवळ केएल राहुलच नाही तर स्पिनर कुलदीप यादवलाही न्यूझीलंडविरुद्ध पुण्यात होणाऱ्या दुसऱ्या कसोटीतून टीम इंडियातून वगळले जाऊ शकते. बेंगळुरू कसोटीच्या पहिल्या डावात कुलदीपने 3 बळी घेतले असले तरी खेळपट्टी लक्षात घेता रोहित शर्मा कुलदीपच्या जागी आकाश दीपला तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देऊ शकते. बेंगळुरू कसोटीत जखमी झालेला यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतही पुणे कसोटीतून बाहेर जाऊ शकतो.   (हेही वाचा  -  IND vs NZ 1st Test 2024: छोट्या-छोट्या चुका केल्या, ज्याची शिक्षा मिळाली… बंगळुरूतील पराभवानंतर रोहित शर्माच स्पष्ट वक्तव्य )

राहुल आणि पंत यांच्या जागी कोण?

न्यूझीलंडविरुद्ध पुण्यात खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटीतून केएल राहुलला वगळण्यात आले, तर त्याच्या जागी शुभमन गिलला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकते. ऋषभ पंतच्या जागी यष्टिरक्षक फलंदाज ध्रुव जुरेलला संधी मिळू शकते. ज्युरेलने टीम इंडियासाठी आतापर्यंत तीन कसोटी खेळल्या आहेत.

भारत-न्यूझीलंडची दुसरी कसोटी कधी होणार?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. बेंगळुरूमधील पहिल्या कसोटीनंतर आता मालिकेतील दुसऱ्या कसोटीसाठी दोन्ही संघ पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर आमनेसामने येतील. दुसरी कसोटी २४ ते २८ ऑक्टोबर दरम्यान खेळवली जाणार आहे. त्यानंतर मालिकेतील तिसरी आणि शेवटची कसोटी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. मालिकेतील शेवटची कसोटी मुंबईत १ ते ५ नोव्हेंबर दरम्यान होणार आहे.