अनेक भारतीय क्रिकेटपटूंनी देशातील 500 हून अधिक लोकांचा बळी घेणाऱ्या कोरोना व्हायरसविरूद्ध (Coronavirus) लढाईत आपले योगदान दिले आहे. भारताचा सलामीवीर केएल राहुल (KL Rahul) देखील या आजारावर मात करण्यास मदत करण्यासाठी पुढे आला असून त्याने त्याची कसोटी जर्सी, एकदिवसीय आणि टी-20 जर्सी, 2019 च्या वर्ल्ड कपमध्ये वापरलेली बॅट आणि इतर काही गीअर्स दान करण्याचा निर्णय घेतला आहे. मुलांसाठी निधी गोळा करण्यासाठी या वस्तूंचा लिलाव केला जाईल. आपल्या 28 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने राहुलने ही घोषणा केली. 2014 मध्ये राहुलने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामन्यात पदार्पण केले होते, तर 2016 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध त्याच्या एकदिवसीय आणि टी-20 करिअरची सुरुवात झाली. आपल्या वाढदिवशी ट्विटरवर पोस्ट केलेल्या व्हिडिओ संदेशात राहुल म्हणाला की, लिलावातून मिळणारी सर्व रक्कम अव्हेर फाउंडेशनकडे जाईल जी भारतातील विस्थापित, वंचित आणि असुरक्षित मुलांना शिक्षणाचा हक्क पुरविण्याचे काम करते.
“मी माझे पॅड, माझे ग्लोव्हस, हेल्मेट्स आणि काही जर्सी आमच्या सहयोगी भागीदार भारत आर्मीला (Bharat Army) देण्याचे ठरविले आहे. ते या गोष्टींचा लिलाव करणार आहेत आणि निधी अवेर फाउंडेशनकडे जाईल. ही एक फाउंडेशन आहे जी मुलांना मदत करण्याकडे पाहत आहे. हे खूप खास आहे आणि हे करण्यासाठी मी यापेक्षा चांगला दिवस निवडू शकलो नाही. लिलाव पहा आणि माझ्यावर आणि मुलांबद्दल काही प्रेम दर्शवा आणि या कठीण काळात एकत्र राहू या आणि आपण सर्वजण या घटनेतून मुक्त होऊ,” तो म्हणाला. 2019 वर्ल्ड कपमध्ये राहुलला राखीव सलामी फलंदाज म्हणून टीम इंडियामध्ये स्थान मिळाले होते, आणि स्पर्धेच्या सुरुवातीच्या टप्प्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली होती. मात्र, शिखर धवनला दुखापत झाल्यानंतर त्याने रोहित शर्मासोबत डावाची सुरुवात केली.
🗣 LIVE AUCTION | The Bharat Army auction is now LIVE!
Help us support vulnerable children in India during #covid_19 and bid for @klrahul11 Helmet, bat, pads, gloves and Test, ODI & T20 Jersey’s.
🔔 BID NOW: https://t.co/VNs7xMZZ5p@GullyLiveFast @theawarefound #COTI 🇮🇳 pic.twitter.com/WXvE7u27Be
— The Bharat Army (@thebharatarmy) April 19, 2020
राहुलचा व्हिडिओ
To mark his 28th Birthday @GullyLiveFast brand ambassador @klrahul11 has kindly donated to Bharat Army his personal cricketing equipment including: Helmet, Bat, Pads, Gloves as well as his Test, ODI and T20 #TeamIndia match worn Jersey’s!
LINK TO BID: https://t.co/VNs7xMZZ5p pic.twitter.com/1dAk2tY0QB
— The Bharat Army (@thebharatarmy) April 18, 2020
राहुल दुसरा क्रिकेटपटू आहे जो निधी गोळा करण्यासाठी त्याच्या क्रिकेट गिअर्सचा लिलाव करीत आहे. अलीकडेच इंग्लंडचा विकेटकीपर-फलंदाज जोस बटलरने दोन हॉस्पिटलच्या मदतीस निधी गोळा करण्यासाठी वर्ल्ड कप 2019 च्या अंतिम सामन्यात घेतलेल्या जर्सीचा लिलाव केला होता. शर्ट 65,100 डॉलर्समध्ये विकला गेला.