KKR vs RR, IPL 2020: राजस्थान रॉयल्सचा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय, नाईट रायडर्समध्ये आंद्रे रसेलचे 'कमबॅक'
कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स (Photo Credit: File Image)

KKR vs RR, IPL 2020: कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यातील आजच्या आयपीएल सामन्यात राजस्थान कर्णधार स्टिव्ह स्मिथने (Steve Smith) टॉस जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोलकाता आणि राजस्थान यांच्यातील आजचा आयपीएल (IPL) सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. दोन्ही संघांसाठी आजच्या सामन्यात विजय मिळवणे गरजेचे आहे, कारण जो जिंकेल तो प्ले ऑफ शर्यतीत बघून राहील आणि पराभूत होणार संघ शर्यतीतून बाहेर पडेल. आजच्या सामन्यासाठी रॉयल्सने प्लेइंग इलेव्हनमध्ये काहीही बदल केला नसून नाईट रायडर्समध्ये दोन बदल पाहायला मिळत आहे. गुणतालिकेत मुंबई इंडियन्स अव्वल स्थानावर असून प्ले ऑफसाठी क्वालिफाय करणारा एकमेव संघ आहे, तर राजस्थान रॉयल्स आणि नाईट रायडर्स प्रत्येकी 12 पॉईंट्ससह अनुक्रमे सहाव्या आणि सातव्या स्थानावर आहेत. (KKR vs RR, IPL 2020 Live Streaming: कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Hotstar आणि Star Network वर)

बेन स्टोक्सच्या फॉर्ममध्ये येण्याने राजस्थान संघ पूर्वीपेक्षा मजबूत झाला आहे. संघाने सलग दोन मोठे सामने जिंकले असल्याने त्यांचे मनोबल उंचावले असेल. स्टोक्ससह संजू सॅमसनने देखील संघाच्या मागील दोन सामन्याच्या विजयात मोठे डाव खेळत महत्वाची भूमिका बजावली आहे. अशा स्थितीत दोंघांकडून पुन्हा एकदा प्रभावी कामगिरीची अपेक्षा असेल. गोलंदाजीत जोफ्रा आर्चर, श्रेयस गोपाल प्रभावी कामगिरी करत आहे. दुसरीकडे, रिंकू सिंहच्या शिवम मावी आणि लोकी फर्ग्युसनच्या जागी आंद्रे रसेलचा नाईट रायडर्सच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश झाला आहे. कोलकातासाठी त्यांची फलंदाजी डोकेदुखी बनली आहे. कोलकाता संघ गेल्या काही सामन्यांपासून अपेक्षेनुसार कामगिरी करू शकलेला नाही आणि म्हणूनच मागील दोन्ही सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे.

पाहा केकेआर आणि रॉयल्सचे प्लेइंग इलेव्हन

कोलकाता नाईट रायडर्स: इयन मॉर्गन (कॅप्टन), शुभमन गिल, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), सुनील नारायण, आंद्रे रसेल, पॅट कमिन्स, कमलेश नागरकोटी, वरुण चक्रवर्ती, शिवम मावी.

राजस्थान रॉयल्स: स्टिव्ह स्मिथ (कॅप्टन), रॉबिन उथप्पा, बेन स्टोक्स, संजू सॅमसन, जोस बटलर, राहुल तेवतिया, रियान पराग, जोफ्रा आर्चर, श्रेयस गोपाल, कार्तिक त्यागी आणि वरुण आरोन.