KKR vs RR, IPL 2020 Live Streaming: इंडियन प्रीमिअर लीगच्या (Indian Premier League) आजच्या 'करा वा मरा'च्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आमने-सामने येतील. रॉयल्स रविवारी नाईट रायडर्सविरुद्ध प्ले ऑफ गाठण्याच्या आपल्या आशा कायम राखण्याच्या उद्देशाने मैदानात उतरतील. रॉयल्सने मागील दोन्ही सामन्यात दमदार फलंदाजीचे प्रदर्शन केले होते, तर नाईट रायडर्सचे फलंदाज संघर्ष करताना दिसले. राजस्थान आणि कोलकाता यांच्यातील आजचा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल, तर टॉस अर्धातासपूर्वी म्हणजे 7:00 वाजता होईल. कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना भारतीय प्रेक्षक स्टार नेटवर्कवर लाईव्ह प्रसारित होईल, तर सामन्याचे लाईव्ह ऑनलाईन स्ट्रीमिंग Disney+ Hotstar वर उपलब्ध असेल. रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि एअरटेलने त्यांच्या ग्राहकांना काही खास ऑफर दिल्या आहेत. ज्याच्या उपयोग करून यूजर्स ऑनलाईन मॅच पाहू शकतात. (IPL 2020 Points Table Updated: मुंबई इंडियन्सचे अव्वल स्थान कायम; RCBविरुद्ध विजय मिळवत सनरायझर्स हैदराबादची पॉईंट्स टेबलवर चौथ्या स्थानी झेप)
राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाबसारख्या संघांना मागील दोन सामन्यात पराभूत केले आहे, तर शेवटच्या सामन्यात केकेआरला चेन्नई सुपर किंग्जकडून पराभव पत्करावा लागला होता. आयपीएलमध्ये आतापर्यंत दोन्ही संघ 21 वेळा आमने-सामने आले असून त्यापैकी कोलकाता नाईट रायडर्सने 11, तर राजस्थान रॉयल्सने 10 सामन्यात विजय मिळवला आहे. या हंगामात खेळल्या गेलेल्या सामन्यात कोलकाताने राजस्थानचा पराभव केला होता.
पाहा कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स संघ
कोलकाता नाईट रायडर्स: इयन मॉर्गन (कॅप्टन), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), नितीश राणा, राहुल त्रिपाठी, रिंकू सिंह, शुभमन गिल, सिद्धेश लाड, कमलेश नागरकोटी, कुलदीप यादव, लोकी फर्ग्यूसन, पॅट कमिन्स, प्रसिद्ध कृष्ण, संदीप वारियर, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती, आंद्रे रसेल, क्रिस ग्रीन, एम सिद्धार्थ, सुनील नारायण, निखिल नाइक, टॉम बंटन, टिम सेफर्ट.
राजस्थान रॉयल्स: रॉबिन उथप्पा, बेन स्टोक्स, स्टीव्ह स्मिथ (कॅप्टन), संजू सॅमसन (विकेटकीपर), जोस बटलर, रियान पराग, राहुल तेवतिया, जोफ्रा आर्चर, श्रेयस गोपाल, अंकित राजपूत, कार्तिक त्यागी, वरुण आरोन, जयदेव उनाडकट, डेविड मिलर, अनिरुद्ध जोशी , मनन वोहरा, टॉम कुरन, अँड्र्यू टाय, शशांक सिंग, महिपाल लोमरोर, ओशाणे थॉमस, मयंक मार्कंडे, अनुज रावत, यशस्वी जयस्वाल, आकाश सिंह.