IPL 2020 Points Table Updated: MI विरुद्ध विजयानंतर SRH संघाचा प्ले-ऑफमध्ये प्रवेश; KKR स्पर्धेतून बाहेर
दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा नुकत्याच संपुष्टात आलेल्या सामन्यात 6 विकेटने सहज पराभव केला. दिल्ली कॅपिटल्सने या विजयासह आयपीएल प्ले ऑफसाठी क्वालिफाय केले. दुसरीकडे, आजच्या सामन्यातील पराभवानंतरही रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने अंतिम-4 संघात स्थान मिळवले. आता कोलकाताच्या प्ले ऑफची शक्यता स्पर्धेच्या 56व्या म्हणजे अखेरच्या साखळी सामन्यावर अवलंबून राहिली आहे.
IPL 2020 Points Table Updated: आयपीएलच्या तेराव्या हंगामातील 56 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादच्या संघाने (Sunrisers Hyderabad) मुंबई इंडियन्सवर (Mumbai Indians) 10 विकेट्सने विजय मिळवला आहे. या विजयामुळे हैदराबादचा संघाने प्ले-ऑफमध्ये (IPL PlayOffs) धडक दिली आहे. आयपीएलच्या गुणतालिकेत मुंबई इंडियन्सचा संघ 18 गुणांसह अव्वल स्थानी आहे. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्स दुसऱ्या क्रमाकांवर असून त्यांना 16 गुण आहेत. तर, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (- 0.172), कोलकाता नाईट राईडर्स (-0.214) आणि सनरायजर्स हैदराबादच्या (+0.608) संघाचे प्रत्येकी 14 गुण आहेत. कोलकाताच्या तुलनेत हैदराबाद आणि बेंगलोरच्या संघाचे अधिक वजन आहे. ज्यामुळे कोलकाताचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
दरम्यान, बीसीसीआयने आयपीएलच्या प्ले ऑफ आणि फायनल सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. 7 नोव्हेंबर रोजी दुबई येथे भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7:30 वाजता पहिला क्वालिफायर खेळला जाईल. हा सामना आयपीएल 2020 च्या गुणतालिकेतील पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाच्या संघांमध्ये खेळला जाईल. हा सामना जिंकणारा संघ थेट आयपीएल 2020 च्या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरेल. त्यानंतर 6 नोव्हेंबर रोजी अबू धाबी येथे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावरील संघात एलीमिनेटर सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7:30 वाजला आयोजित केला जाईल.
नेट रन रेटसह अपडेटेड आयपीएल 2020 पॉइंट्स टेबल
| Rank | Team | Played | Won | Loss | Draw | Net Run-Rate | Points |
| Q | मुंबई इंडियन्स | 13 | 9 | 4 | 0 | +1.186 | 18 |
| Q | दिल्ली कॅपिटल्स | 14 | 8 | 6 | 0 | -0.109 | 16 |
| Q | सनरायझर्स हैदराबाद | 14 | 7 | 7 | 0 | +0. 618 | 14 |
| 4 | रॉयल चॅलेंजर्स बंगलोर | 14 | 7 | 7 | 0 | -0.172 | 14 |
| 5 | कोलकाता नाईट राईडर्स | 14 | 7 | 7 | 0 | -0.214 | 14 |
| 6 | किंग्ज इलेव्हन पंजाब | 14 | 6 | 7 | 0 | -0.162 | 12 |
| 7 | चेन्नई सुपर किंग्ज | 14 | 6 | 8 | 0 | -0.455 | 12 |
| 8 | राजस्थान रॉयल्स | 14 | 6 | 8 | 0 | -0.569 | 12 |
इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात मुंबई इंडियन्स सर्वात यशस्वी संघ आहे आणि त्यांच्या नावावर चार विजेते आहेत तर चेन्नई सुपर किंग्जने तीन जिंकली आहेत. केवळ कोलकाता नाइट रायडर्स (2012 आणि 2014), सनरायझर्स हैदराबाद (2016) आणि राजस्थान रॉयल्स (2008) विजेतेपद जिंकणारे इतर संघ आहेत. आता नाउमेद झालेल्या डेक्कन चार्जर्सने 2009 मध्ये जेतेपद जिंकले होते.
(The above story first appeared on LatestLY on Nov 04, 2020 12:31 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

