IPL 2020 Orange Cap Holder List Updated: केएल राहुलने 'ऑरेंज कॅप'ची जिंकली शर्यत, इतक्या धावांनी शिखर धवनचे झाले स्वप्न भंग
किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार केएल राहुल (Photo Credit: PTI)

IPL 2020 Orange Cap Holder List Updated: किंग्ज इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab) संघ प्ले ऑफ शर्यतीतून बाहेर पडला असला तरी कर्णधार केएल राहुलने (KL Rahul) आयपीएल 2020 ची ऑरेंज कॅपवर (IPL Orange Cap) आपले नाव कोरले. राहुलने चालू हंगामातील सर्वोत्तम फलंदाजीचा नमुना सादर केला आणि 14 सामन्यात 55.83 च्या सरासरीने 670 धावा केल्या. यात एक शतक आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे. अंतिम सामन्यापर्यंत कोणताही फलंदाज राहुलच्या धावांची संख्या तोडू शकला नाही. दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) सलामी फलंदाज शिखर धवनने (Shikhar Dhawan) 618 धावांसह स्पर्धा संपुष्टात आणली. ऑरेंज कॅप शर्यतीत त्याने दुसरे स्थान मिळविले. धवनने 17 सामन्यात दोन शतके आणि चार अर्धशतकांच्या मदतीने 618 धावा केल्या. हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नरने 548 धावा करून तिसरे, श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) चौथे तर मुंबई इंडियन्सच्या ईशान किशनने (Ishan Kishan) पाचवे स्थान पटकावले. श्रेयसने 519 तर ईशानने 516 धावा केल्या. (IPL 2020 Purple Cap Holder List: दिल्ली कॅपिटल्सचा कगिसो रबाडा पर्पल कॅप यादीत अव्वल स्थानी कायम, पाहा टॉप-5 गोलंदाजांची लिस्ट)

प्रत्येक वर्षी आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांला 'ऑरेंज कॅप' देण्यात येते. इंडियन प्रीमियर लीग, संपूर्ण भारतीय लीग असली तरी दरवर्षी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये विदेशी खेळाडूंचे वर्चस्व पाहायला मिळाले आहेत. आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत एकूण 12 आयपीएल सीझन खेळले गेले असून यात तीन वेळा भारतीय खेळाडूंनी ऑरेंज कॅप जिंकली, परदेशी फलंदाजांनी नऊ वेळा हा मान मिळवला आहे. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या डेविड वॉर्नरने सर्वाधिक तीन वेळा ऑरेंज कॅप पटकावली आहे. वॉर्नरने अनुक्रमे 2015, 2017 आणि 2019 आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करून ऑरेंज कॅप जिंकली आहे.

आयपीएल 13 ऑरेंज कॅप खेळाडूंची यादी

क्रमवारी प्लेअर संघ सामने खेळले धावा
1 केएल राहुल किंग्ज इलेव्हन पंजाब 14 670
2 शिखर धवन दिल्ली कॅपिटल्स 16 603
3 डेविड वॉर्नर सनरायझर्स हैदराबाद 16 548
4 ईशान किशन मुंबई इंडियन्स 13 483
5 क्विंटन डी कॉक मुंबई इंडियन्स 15 483

2008 मध्ये ऑरेंज कॅपवर ऑस्ट्रेलियन फलंदाज शॉन मार्शने कब्जा केला होता. त्याने किंग्स इलेव्हन पंजाबकडून खेळत 616 धावा केल्या. यानंतर 2009मध्ये मॅथ्यू हेडन, 2010मध्ये सचिन तेंडुलकर, तर 2011 आणि 12मध्ये क्रिस गेल यांनी हा सन्मान पटकावला. 2013 मध्ये माइकल हसी, 2014 मध्ये रॉबिन उथप्पा, 2015 मध्ये वॉर्नर, 2016 मध्ये विराट कोहली, 2017 मध्ये पुन्हा वॉर्नर, 2018 मध्ये केन विल्यमसन आणि 2019मध्ये पुन्हा वॉर्नर ऑरेंज कॅप मिळवण्यात यशस्वी ठरला.