IPL 2020 Purple Cap Holder List: 'पर्पल कॅप'साठी गोलंदाजांमध्ये चुरशीची लढत, पाहा लेटेस्ट लिस्ट
पर्पल कॅप (Photo Credits: File Photo)

IPL 2020 Purple Cap Holder List: इंडियन प्रीमिअर लीगच्या (Indian Premier League) 13 व्या सत्रात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला देण्यात येणाऱ्या 'पर्पल कॅप'साठी चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध आयपीएलच्या (IPL) 50व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या (Rajasthan Royals) जोफ्रा आर्चरने (Jofra Archer) विकेट घेतल्या आणि यंदाच्या स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत चौथे स्थान मिळवले. आर्चरने मनदीप सिंह आणि क्रिस गेलची मोठी विकेट घेतली. यासह आर्चरने 13 सामन्यात 19 विकेट घेतल्या आणि चौथे स्थान पटकावले व यासाठी त्याने आरसीबीच्या (RBC) युजवेंद्र चहलला (Yuzvendra Chahal) पाचव्या स्थानावर ढकलले. चहलने 12 सामन्यात 18 विकेट घेतल्या आहेत. कगिसो रबाडाच्या (Kagiso Rabada) डोक्यावर 23 विकेट्ससह 'पर्पल कॅप' सजली आहे, तर अन्य गोलंदाज 'पर्पल कॅप' मिळवण्यासाठी रबाडाला लढा देण्याच्या जवळ पोहचत आहे. आरसीबीविरुद्ध सामन्यात मुंबई इंडियन्सच्या जसप्रीत बुमराहने 3 विकेट घेत 'पर्पल कॅप'च्या यादीत दुसरे स्थान पटकावले आहे. 12 सामन्यात 20 विकेट घेत बुमराहने सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दुसरे स्थान पटकावले आहे. किंग्स इलेव्हन पंजाबच्या मोहम्मद शमीने तितक्याच सामन्यात 20 गडी बाद केले आहेत, मात्र बुमराहची इकॉनॉमी प्रभावी असल्याने तो दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे. (IPL 2020 Orange Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट)

आयपीएल (IPL) स्पर्धेच्या शेवटी, मोसमात सर्वोत्तम गोलंदाजी व फलंदाजी करणाऱ्या खेळाडूंना अनुक्रमे पर्पल कॅप (Purple Cacp) आणि ऑरेंज कॅप देण्यात येते. संपूर्ण स्पर्धेत सर्वाधिक विकेट मिळवणाऱ्या खेळाडूला पर्पल कॅप दिली जाते. प्रत्येक सामन्यासह या यादीत बदल होत राहातील आणि स्पर्धेच्या अखेरीस पर्पल कॅप (Purple Cap) मिळवण्यासाठी गोलंदाजांना आपला सर्वोत्तम खेळ करावा लागला आहे.

Rank Player Team Matches Played Wickets
1 कगिसो रबाडा दिल्ली कॅपिटल्स 12 23
2 जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्स 12 20
3 मोहम्मद शमी किंग्ज इलेव्हन पंजाब 13 20
4 जोफ्रा आर्चर राजस्थान रॉयल 13 19
5 राशीद खान सनरायझर्स हैदराबाद 12 18

आयपीएलच्या पहिल्या सत्रात म्हणजेच 2008 मध्ये पहिल्यांदा पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज सोहेल तन्वीरने पर्पल कॅप जिंकली होती. राजस्थान रॉयल्सकडून खेळत एकूण 22 विकेट्स घेऊन तनवीरने या मोसमात शानदार गोलंदाजी केली. आयपीएलचा पहिला सत्र राजस्थान संघाने जिंकला आणि त्यात सोहेल तन्वीरने मुख्य भूमिका बजावली होती. यानंतर, आरपी सिंहनेडेक्कन चार्जर्सकडून खेळताना त्याने एकूण 23 विकेट घेऊन 2009 मध्ये पर्पल कॅप आपल्या नावावर केली. यानंतर, 2010 मध्ये, प्रग्यान ओझा यांनी पर्पल कॅप ताब्यात घेतला. 2011 मध्ये लसिथ मलिंगा, 2012 मध्ये मॉर्ने मॉर्केल, 2013 मध्ये ड्वेन ब्राव्हो, 2014 मध्ये मोहित शर्मा, 2015 मध्ये ड्वेन ब्राव्हो, 2016 मध्ये भुवनेश्वर कुमार, 2017 मध्ये भुवनेश्वर कुमार, 2018 मध्ये अँड्र्यू टाय आणि 2019 मध्ये इमरान ताहिरने पर्पल कॅप काबीज केली.