Cricketers Publicly Criticized Their Boards: खेळाडूंनी त्यांच्या क्रिकेट (Cricket) बोर्डाच्या कृतीवर समाधानी नसल्याची उदाहरणे सध्याच्या काळात वाढू लागली आहेत आणि यापैकी आणखी काही प्रकरणे पुढे येणे आश्चर्यकारक ठरले नाही. एखाद्या खेळाडूला जेव्हा संघातून वगळले जाते तेव्हा खेळाडूला हे पचवणे अवघड जाते कारण आंतरराष्ट्रीय खेळाडूचा दर्जा मिळवण्यासाठी त्याने बरेच बलिदान दिले आहेत आणि त्यासाठी त्याला आवश्यक तो सन्मान मिळणे गरजेचा आहे. नुकतंच श्रीलंकन (Sri Lanka) खेळाडूंनी आवाज उठवत आपल्याच बोर्डावर टीका केली आहे. मात्र क्रिकेटविश्वात अशा बऱ्याच घटना आहेत जेव्हा सक्रिय खेळाडूंनी आपल्याच बोर्डाविरुद्ध सार्वजनिकरित्या आवाज उठवला आणि त्यांच्या कृतींवर हल्लाबोल केला. (हे 5 दिग्गज खेळाडू यशाचे ‘एव्हरेस्ट’ सर केल्यावर बनले खलनायक, भारतीय ऑलिम्पिक पदक विजेताही यादीत सामील)
कामरान अकमलचा निवड समितीला प्रश्न
पाकिस्तानचा विकेटकीपर-फलंदाज कामरान अकमलला (Kamran Akmal) चांगल्या फॉर्ममध्ये असूनही 2016 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच एकदिवसीय मालिकेसाठी संघातून वगळण्यात आले. आपली निराशा व्यक्त करण्यासाठी त्याने एक्स्प्रेस ट्रिब्यूनला दिलेल्या मुलाखतीत पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर हल्लाबोल केला. आपली निवड होईल याची त्याका खात्री होती आणि त्याने घरगुती हंगामातही सर्व फॉर्मेटमध्ये प्रभावी कामगिरी बजावली होती. कामरान सध्या 39 वर्षाचा असून महत्त्वपूर्ण क्षणात त्याने देशासाठी बऱ्याच सामन्यात मॅच-विनिंग खेळी केली आहे.
ड्वेन ब्रावोने भारत दौऱ्यावरून घेतली माघार
2014 मध्ये वेस्ट इंडीजचा अष्टपैलू ड्वेन ब्रावोने (Dwayne Bravo) वेतनासाठी वेस्ट इंडियन बोर्डाशी (West Indies Board) झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर भारत दौऱ्यातून माघार घेतली होती. ब्रावोने बोलणी करण्यासाठी व्यवस्थापनाला पत्र लिहिले होते पण ते बोर्डाने फेटाळून लावले जे कर्णधाराला विशेष आवडले नाही. ब्रावोने मालिकेमधून माघार घेणे अनपेक्षित होते आणि वेव्हल हिंद्स त्यावेळी वेस्ट इंडीज प्लेयर्स असोसिएशनचे अध्यक्ष होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर वर्ल्ड कपसाठी वेस्ट इंडीज टी-20 संघात परतण्यापूर्वी ब्रावो जगभरातील फक्त फ्रँचायझी क्रिकेट खेळला.
मोहिंदर अमरनाथ यांनी निवड समीतील धरले धारेवर
1980 च्या उत्तरार्धात भारतीय फलंदाजीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या मोहिंदर अमरनाथ (Mohinder Amarnath) यांना उत्तम कामगिरी करूनही अचानक संघातून डच्चू देण्यात आला होता. अशी अफवा होती की, अमरनाथ आणि निवडकर्त्यांमध्ये काही मुद्यांवर मतभेद होते, ज्यामुळेच त्यांना संघातून बाहेर करण्यात आले. यादरम्यान, अमरनाथ यांनी निवडकर्त्यांना “विदूषकांची टोळी” म्हणत आपली निराशा व्यक्त केली. 1983 वर्ल्ड कप स्पर्धेतील भारताच्या विजयात प्रभावी कामगिरीसाठी आज मोहिंदर अमरनाथ यांची आठवण काढली जाते.
अॅशेस मालिकेतून केविन पीटरसनला (Kevin Pietersen) डच्चू
अॅशेस (Ashes) दौर्यासाठी त्याला निवडले जाणार नाही असे इंग्लंड क्रिकेट (England Cricket) बोर्डाने पीटरसनला सांगितले होते जो की हा एक मोठा वाद ठरला. पीटरसन नेहमीच एक रोमांचक खेळाडू होता आणि इंग्लंड संघाकडून खेळलेला तो सर्वोत्तम फलंदाज म्हणून ओळखला जातो. परंतु त्याचे नेहमीच क्रिकेट बोर्ड आणि निवड समितीशी वाद राहिला ज्यामुळे त्याला संघात स्थान देण्यात काहीच मदत झाली नाही. इंग्लिश संघातून त्याला डच्चू दिल्यावर त्याने उघडपणे बोर्डावर टीका केली आणि त्याला पुरेशी संधी न दिल्याबद्दल नेहमीच टीका केली.
श्रीलंकेच्या खेळाडूंनी करारनामा करण्यास नकार दिला
श्रीलंका क्रिकेट बोर्डाने (Sri Lanka Cricket Board) खेळाडूंच्या पगारासाठी नवीन नियम लादत असे म्हटले आहे की खेळाडूंना त्यांच्या कामगिरीच्या आधारावर त्यांच्या पगारामध्ये कपात होईल आणि प्रोत्साहन राशी दिली जाईल. हा एक वादाचा विषय ठरला असून श्रीलंकेच्या खेळाडूंनी त्यांचा बेस पगार चालूच ठेवावा अशी इच्छा व्यक्त करत नवीन करारावर सही करण्यास नकार दिला आणि त्यांनी खेळाडूंकडून केलेल्या मूल्यांकनांसह स्पष्टीकरण देण्याची विनंतीही बोर्डाला केली आहे.