हे 5 दिग्गज खेळाडू यशाचे ‘एव्हरेस्ट’ सर केल्यावर बनले खलनायक, भारतीय ऑलिम्पिक पदक विजेताही यादीत सामील
हॅन्सी क्रोन्जे आणि सुशील कुमार (Photo Credit: Facebook, Instagram)

सुशील कुमारने (Sushil Kumar) 2008 ऑलिम्पिक (Olympic) स्पर्धेत कांस्यपदक जिंकून देशातील कुस्तीला एक नवीन ओळख मिळवून दिली. 2012 ऑलिम्पिकमध्ये त्याने पुन्हा एकदा रौप्यपदकाची कमाई केली. यानंतर देशातील छोट्या छोट्या भागातही कुस्तीला ओळख मिळाली. मोठ्या संख्येने खेळाडू या खेळाकडे वळले. पण आज सुशील कुमार वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. छत्रसाल स्टेडियमवरील (Chhatrasal Stadium) 23 वर्षीय सागर राणा (Sgar Rana) मारहाण आणि हत्या प्रकरणातील आरोपी ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमारला दिल्ली पोलिसांच्या (Delhi Police) विशेष पथकाने अटक केली आहे. तथापि यशाचे ‘एव्हरेस्ट’ शिखर सर करून खलनायक बनलेला कुमार काही पहिला खेळाडू नाही आहे. पाच मोठे दिग्गज खेळाडू जे यशाच्या शिखरावर असताना काही कारणास्तव खलनायक बनले खेलीलप्रमाणे आहेत. (Sagar Rana Murder Case: कुस्तीपटू सुशील कुमार याला 6 दिवसांची पोलीस कोठडी, सागर राणा याची हत्या केल्याचा आरोप)

माईक टायसन (Mike Tyson)

अमेरिकेचे प्रख्यात बॉक्सिंग खेळाडू टायसन यांची गणना हेवीवेट प्रकारातील सर्वकालिक महान खेळाडूंमध्ये केली जाते. 1992 मध्ये टायसन यांना बलात्काराच्या आरोपाखाली दोषी ठरवण्यात आल्यावर सहा वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा आणि 30,000 डॉलर्सचे कॉम्पन्सेशन देण्यास सांगितले होते.

डिएगो मॅराडोना (Diego Maradona)

अर्जेन्टिनाचे माजी कर्णधार मॅराडोनाच्या नेतृत्वात संघाने 1986 मध्ये आजवरचा एकमेव फुटबॉल वर्ल्ड कप जिंकला होता. त्यांनी एकूण 4 फुटबॉल वर्ल्ड कप खेळले पण ते परंतु ड्रग्जमुळे तो वादात सापडले होते. 1994 विश्वचषक स्पर्धेदरम्यान दोन सामन्यांनंतरच त्यांना त्वरित घरी पाठवण्यात आले होते. त्यांनी ग्रीस विरोधात स्पर्धेत एकमात्र गोल केल्या त्यानंतर एफेड्रिन डोपिंगसाठी औषधाची चाचणी अयशस्वी झाल्यावर त्यांना घरी पाठवण्यात आले होते. हा मॅरेडोनाचे अर्जेटिनासाठी अखेरचा आंतरराष्ट्रीय गोल ठरला.

हॅन्सी क्रोन्जे (Hansie Cronje)

2000 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा एक यशस्वी कर्णधार क्रॉन्जे मॅच फिक्सिंगमध्ये अडकले. या प्रकरणाने त्यावेळी संपूर्ण क्रीडा जगाला हादरवून सोडले होते. यानंतर त्यांच्यावर आजीवन बंदी घालण्यात आली. या घटनेच्या दोन वर्षानंतर, 2002 मध्ये विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला. त्याने दक्षिण आफ्रिकेसाठी 68 कसोटी आणि 188 एकदिवसीय सामने खेळले असून 300 पेक्षा जास्त लिस्ट A सामने खेळले आहेत.

लान्स आर्मस्ट्राँग (Lance Armstrong)

अमेरिकेचे प्रसिद्ध सायकलपटू लान्स आर्मस्ट्राँगने 7 वेळा टूर डी फ्रान्सचे जेतेपद जिंकले होते. सर्व यश आणि वैभव असूनही आर्मस्ट्रॉंगची कारकीर्द वादविवादाने भरलेली होती. त्यांच्यावर सतत कार्यक्षमता वाढविणारी औषधे घेत असल्याचा आरोप केला जात होता जो त्यांनी वेळोवेळी नाकारला. अखेरीस, सत्य बाहेर आले. 2012 मध्ये अमेरिकेच्या अँटी-डोपिंग एजन्सीच्या अहवालानंतर आर्मस्ट्राँग कडून त्यांचे सात टूर डी फ्रान्सचे विजेतेपद काढून घेण्यात आले आणि 2013 मध्ये त्यांनी आपल्या प्रत्येक टूर डी फ्रान्स विजयादरम्यान डोप केल्याचे उघडपणे मान्य केले.

श्रीसंत, अजित चंडिला आणि अंकित चव्हाण

2013 आयपीएलला हादरवून सोडणाऱ्या या स्पॉट-फिक्सिंग प्रकरणात राजस्थान रॉयल्सच्या तीन खेळाडूंचा समावेश होता. या खेळाडूंच्या अटकेनंतर अनेक विंदू दारा सिंह व चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) संघाचे प्रधान आणि बीसीसीआय अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचे जावई गुरुनाथ मयप्पनचे नाव देखील समोर आले. सध्याच्या घडीला श्रीसंतवरील बंदी हटवली गेली असली तरी चव्हाण आणि चंडिला यांच्यावर आजीवन क्रिकेटमधून बंदी घालण्यात आली आहे.