Team India Schedule 2023: हे वर्ष म्हणजे 2023 टीम इंडियासाठी (Team India) खूप व्यस्त असणार आहे. 2023 मध्ये टीम इंडियाला श्रीलंका, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियासोबत मालिका खेळायची आहे. यानंतर आयपीएलचा 16वा सीझनही सुरू होणार आहे. आयपीएलनंतर वेस्ट इंडिज दौरा, त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये एकदिवसीय विश्वचषक आणि त्यानंतर आशिया चषकही खेळवला जाणार आहे. टीम इंडियाला 2023 च्या अखेरीस दक्षिण आफ्रिकेचा दौरा देखील करायचा आहे. या वर्षी दोन मोठ्या आयसीसी स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत. याशिवाय आशियातील सर्वात मोठी स्पर्धाही खेळवली जाणार आहे. आयसीसी इव्हेंटमध्ये, एक वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना आहे आणि दुसरा 2023 एकदिवसीय विश्वचषक आहे. त्याचबरोबर आशिया चषकही यंदा खेळवला जाणार आहे. यंदा टीम इंडियाला इतिहास रचण्याची सुवर्णसंधी आहे.
यावर्षी एकदिवसीय विश्वचषक फक्त भारतातच होणार आहे. टीम इंडियासाठी ही स्पर्धा खूप महत्त्वाची मानली जात आहे. 2011 साली टीम इंडियाने शेवटचा एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. त्याच वेळी, 2013 पासून टीम इंडियाने आयसीसीची कोणतीही स्पर्धा जिंकलेली नाही. अशा स्थितीत टीम इंडिया घरच्या मैदानावर 2023 चा वनडे वर्ल्ड कप जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. (हे देखील वाचा: BCCI World Cup Shortlist Players: टीम इंडियाच्या विश्वचषक 2023 मधील 20 संभाव्य खेळाडू शार्टलिस्ट, जाणून घ्या कोणाल मिळाले स्थान)
टीम इंडियाचे या वर्षाचे म्हणजे 2023 चे वेळापत्रक
जानेवारी: श्रीलंकेसोबत तीन सामन्यांची एकदिवसीय आणि तितकी टी-20 मालिका
जानेवारी-फेब्रुवारी: न्यूझीलंडचा भारत दौरा - तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 सामने
फेब्रुवारी-मार्च: ऑस्ट्रेलियासोबत चार कसोटी आणि तीन एकदिवसीय सामने
एप्रिल-मे: आयपीएलचा 16 वा हंगाम
जून: WTC फायनल 2023 (जर टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचली तर)
जुलै-ऑगस्ट: टीम इंडिया वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाईल, 2 कसोटी, 3 वनडे आणि 3 टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाईल
सप्टेंबर: 2023 आशिया कप
सप्टेंबर: ऑस्ट्रेलियन संघ तीन एकदिवसीय सामन्यांसाठी भारतात येणार आहे
10 ऑक्टोबर: 26 नोव्हेंबर: 2023 एकदिवसीय विश्वचषक
नोव्हेंबर-डिसेंबर: ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा (5 सामन्यांची T20I मालिका)
डिसेंबर: टीम इंडिया डिसेंबरच्या अखेरीस दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाईल, 2 कसोटी, 3 एकदिवसीय आणि 3 T20 सामन्यांची मालिका खेळली जाईल.