![](https://mrst1.latestly.com/uploads/images/2025/02/zim-vs-ire-1-.jpg?width=380&height=214)
ZIM vs IRE 1st ODI 2025: झिम्बाबवे आणि आयर्लड यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना हारारे स्पोर्टस क्लब येथे खेळला जाईल. आयर्लंड आणि झिम्बाब्वे यांच्यातील अलिकडचा एकमेव कसोटी सामना रोमांचक होता, ज्यामध्ये पहिल्या डावात आघाडी गमावूनही आयर्लंडने विजय मिळवला. यावेळी दोन्ही संघ नवीन कर्णधारांच्या नेतृत्वाखाली खेळतील, जिथे पॉल स्टर्लिंग आयर्लंडचे नेतृत्व करणार आहे तर क्रेग एर्विन झिम्बाब्वेचे नेतृत्व करेल. दरम्यान, आयर्लंडचा कर्णधार पॉल स्टर्लिंगने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. आणि झिम्बाब्वेला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
हेड टू हेड आकडेवारी
झिम्बाबवे आणि आयर्लड यांच्या एकदिवसीय सामन्यात 22 वेळा आमनेसामने आले आहे. यापैकी झिम्बाबवेने 8 तर आयर्लडने 10 सामने जिंकले. आकडेवारीमध्ये असे दिसुन येते की आयर्लडचा झिम्बाबवेविरुद्ध वरचष्मा राहिला आहे. (हे देखील वाचा: PAK vs NZ, ODI Tri-Series 2025 Final Match Pitch Report And Weather Update: कराचीमध्ये फलंदाज की गोलंदाज कोण करणार कहर? सामन्यापूर्वी खेळपट्टीचा अहवाल आणि हवामानाची परिस्थिती घ्या जाणून)
कुठे पाहणार सामना?
दुर्दैवाने, आयर्लंड आणि झिम्बाब्वे यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना भारतातील कोणत्याही टीव्ही चॅनेलवर थेट प्रक्षेपित केला जाणार नाही. भारतीय प्रेक्षकांना हा सामना टीव्हीवर पाहण्याचा पर्याय राहणार नाही. पण क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, भारतीय चाहते फॅनकोड अॅप आणि वेबसाइटद्वारे लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे हा रोमांचक एकदिवसीय सामना पाहू शकतात.
पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11
आयर्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ: पॉल स्टर्लिंग (कर्णधार), अँड्र्यू बालबर्नी, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर (यष्टीरक्षक), कर्टिस कॅम्फर, जॉर्ज डॉकरेल, अँडी मॅकब्राइन, मार्क अडायर, ग्राहम ह्यूम, मॅथ्यू हम्फ्रीज, जोशुआ लिटिल
झिम्बाब्वे राष्ट्रीय क्रिकेट संघ: तादिवानाशे मारुमानी (विकेटकीपर), बेन कुरन, क्रेग एर्विन (कर्णधार), सिकंदर रझा, ब्रायन बेनेट, वेस्ली माधेवरे, जोनाथन कॅम्पबेल, वेलिंग्टन मसाकाड्झा, न्यूमन न्यामुरी, रिचर्ड नगारावा, ब्लेसिंग मुझाराबानी