IRE vs SL 1st ODI: श्रीलंकेचा महिला संघ सध्या आयसीसी महिला चॅम्पियनशिपमध्ये खेळण्यासाठी 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी आयर्लंडच्या दौऱ्यावर आहे. या मालिकेतील पहिला सामना 16 ऑगस्ट रोजी बेलफास्टच्या मैदानावर खेळला गेला ज्यामध्ये श्रीलंकेच्या महिला संघाची युवा सलामीवीर फलंदाज विश्मी गुणरत्नेने (Vishmi Gunaratne) या सामन्यात शानदार शतक झळकावले. मात्र, तिचे शतक संघाला विजयासाठी अपुरे ठरले. असे असूनही विश्मीचे नाव निश्चितच एका विशेष यादीत समाविष्ट झाले आहे. वनडेमध्ये शतक झळकावण्याचा विक्रम करणारी विश्मी आता आशियातील दुसरी सर्वात तरुण महिला खेळाडू ठरली आहे. (हे देखील वाचा: Niroshan Dickwella Banned: श्रीलंकेचा यष्टीरक्षक निरोशन डिकवेलावर मोठी कारवाई, क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटवर बंदी; जाणून घ्या कारण)
Congratulations Vishmi 🏏🇱🇰👌
Vishmi Gunaratne becomes the first Sri Lanka Women's player other than Chamari Athapaththu to score an ODI Century in the 1st ODI against Ireland in Belfast.pic.twitter.com/ALp1MiRDYD #LKA #SriLanka #CricketTwitter
— Sri Lanka Tweet 🇱🇰 (@SriLankaTweet) August 16, 2024
विश्मीने स्मृती मानधनाचा विक्रम मोडला
महिला वनडे क्रिकेटमध्ये शतक झळकावणारी सर्वात तरुण आशियाई खेळाडू होण्याचा विक्रम मिताली राजच्या नावावर आहे, जिने 1999 मध्ये केवळ 16 वर्षे 205 दिवस वयाच्या आयर्लंड महिला संघाविरुद्ध शतक झळकावले होते. आता या यादीत विश्मीचे नाव दुसऱ्या स्थानावर आले आहे, जिने 18 वर्षे 360 दिवस वयाच्या वनडेमध्ये शतक झळकावण्याचा पराक्रम केला आहे. विश्मीने आयर्लंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात एकूण 98 चेंडूंचा सामना करत एकूण 101 धावा केल्या, ज्यात एकूण 9 चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता.
महिला वनडेत शतक झळकावणारी सर्वात तरुण खेळाडू
मिताली राज - 16 वर्षे 205 दिवस (वि. आयर्लंड महिला संघ, 1999)
विश्मी राज - 18 वर्षे 360 दिवस (वि. आयर्लंड महिला संघ, 2024)
स्मृती मानधना - 19 वर्षे 202 दिवस (वि. ऑस्ट्रेलिया महिला संघ, 2016)
दीप्ती शर्मा - 19 वर्षे 264 दिवस (वि. आयर्लंड महिला संघ, 2017)
विश्मीच्या डावावर भारी ओरला प्रेंडरगास्टचे शतक
प्रथम फलंदाजी करताना विश्मी गुणरत्नेच्या शतकी खेळीच्या जोरावर श्रीलंकेच्या महिला संघाने 50 षटकांत 8 गडी गमावून 260 धावा केल्या. यानंतर आयर्लंडच्या महिला संघाने लक्ष्याचा पाठलाग करताना एकवेळ 4 विकेट गमावून 138 धावांपर्यंत मजल मारली होती. येथून ओरला प्रेंडरगास्टने एका टोकाकडून डाव सांभाळत संघाला विजयापर्यंत नेण्याची जबाबदारी स्वीकारली आणि 107 चेंडूत 122 धावांची नाबाद सामना जिंकणारी खेळी केली. आयर्लंड महिला संघाने 4 चेंडू शिल्लक असताना 261 धावांचे लक्ष्य गाठले आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. तसेच आयर्लंड महिला संघाचा श्रीलंकेविरुद्ध 50 षटकांच्या फॉरमॅटमधील हा पहिला विजय आहे.