
आयपीएलचा नवीन हंगाम (IPL 2025) सुरू होण्याआधी आंतरराष्ट्रीय ब्रॅंड 1xBet तर्फे चाहत्यांची आयपीएल 2025 मध्ये सहभागी कोणते खेळाडू आणि संघांना पसंती आहे, हे जाणून घेण्यासाठी एक अभ्यास करण्यात आला. अभ्यासात 3,500 सहभागींनी भाग घेतला. सहभागींना ते आयपीएल 2025 मधील ज्या खेळाडू आणि संघांना पाठिंबा देणार आहेत, त्यांची निवड करण्यास सांगण्यात आले. आपल्या पसंतीचा खेळाडू अथवा संघ निवडण्यामागे कोणती महत्त्वाची कारणे आहेत, ते ही सहभागींनी दर्शवणे आवश्यक होते. हा अभ्यास स्थानिक स्तरावर मिळालेली मत आणि वयोगट ही दाखवतो ज्यातून सहभागींची पसंती ठरली आहे.
हा अभ्यास आयपीएल 2025 सुरू होण्याच्या एक महिना आधी करण्यात आला आहे ज्यामुळे सीझनच्या आधी चाहत्यांच्या मनात नक्की काय आहे ते अचूकतेने दिसून येते.
आयपीएल 2025 मधील चाहत्यांचा सर्वात जास्त पाठिंबा असलेले खेळाडू-
या अभ्यासात नवीन सीझन मध्ये असे 13 खेळाडू दिसून आले ज्यांना भारतीय क्रिकेट चाहत्यांचा सर्वाधिक पाठिंबा राहणार आहे:
- विराट कोहली (27,4%)
- रोहित शर्मा(12,4%) आणि महेंद्र सिंग धोनी (12,4%)
- अभिषेक शर्मा (11,1%)
- जसप्रीत बुमराह (4,3%)
- यशस्वी जयस्वाल (4,2%)
- हार्दिक पांड्या (4,0%)
- ऋषभ पंत (2,9%)
- केएल राहूल(2,5%)
- हेंन्रिक क्लासेन आणि सुर्यकुमार यादव (2,4%)
- संजू सॅमसन आणि शुभमन गिल (2,3%)
भारतीय क्रिकेट मधील महान मानला जाणारा विराट कोहली जो Royal Challengers Bengaluru साठी खेळतो, त्याला चाहत्यांच्या पसंतीत दुसर्या स्थानावरील खेळाडू पेक्षा दुप्पट पसंती मिळाली आहे. प्रत्येक तीन सहभागींपैकी एकाची पसंती म्हणजे 27.4% चाहत्यांनी भारताच्या या माजी कर्णधाराला पसंती दिली, जो गेल्या सिझन मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज सुद्धा होता. त्याचे उत्तम तंत्र, अनोखी आक्रमक शैली या बाबींना चाहत्यांनी पसंती दर्शवली पण त्याच बरोबर ज्याचे जादूई व्यक्तिमत्व आणि जिंकण्याची मानसिकता ह्या बाबी सुद्धा तेवढ्याच कारणीभूत आहेत.
अद्वितीय आणि महान अशा विराट कोहलीचा खेळ म्हणजे जादू आहे आणि त्याच कर्तृत्व हे अमर आहे. विराट कोहलीला सर्वात जास्त मत ही 25-34 (46.8%) या वयोगटात मिळाली, दुसर्या स्थानावर हा 20-24 (33.1%) वयोगट दिसून आला. त्याच बरोबर 60+ च्या सर्वात वयस्क गटातही दखल घेतलेल्या खेळाडूंमध्ये तो एकटाच दिसून आला. विराट कोहली सर्व भारतात लोकप्रिय आहे. त्याला सर्वात जास्त पसंती कर्नाटक(12%) आणि त्यानंतर आंध्र प्रदेश(11.3%), उत्तर प्रदेश(11%), , तेलंगाणा (9.7%),आणि महाराष्ट्र(7.2%) अशी आहे.
पोलच्या अगदी शेवटपर्यंत रोहित शर्मा दुसर्या स्थानावर होता पण Chennai Super King’s महान खेळाडू महेंद्र सिंग धोनी ने त्याला गाठलेच आणि दोघांना 12.4% एवढी समान मते मिळाली. रोहित शर्मा म्हणजे नजाकत, बरोबरीने आक्रमकता आणि नेतृत्व कौशल्य याचा आधुनिक क्रिकेट मधील संगम आहे. हिटमॅन म्हणून चाहत्यांमध्ये प्रिय असलेला रोहित शर्मा प्रतिस्पर्धी गोलंदाजांची आक्रमक फलंदाजीने दाणादाण उडवण्यासाठी ओळखला जातो. जलदगती गोलंदाज आणि स्पिनर्स अशा दोघांनाही तितक्याच सहजतेने खेळण्याच्या त्याच्या कौशल्यामुळे तो जगातील सर्वोत्तम सलामीचा फलंदाज म्हणून ओळखला जातो. शांतपणे आणि चलाखीने विचार करण्याच्या त्याच्या कौशल्याने तो एक यशस्वी कर्णधारही ठरला आहे. त्याच्या नेतृत्वात मुंबईने पाच वेळा IPL जिंकली आहे तर राष्ट्रीय संघाने टी20 विश्वचषक जिंकला आहे.
हा खेळाडू कसोटी, एकदिवशीय़ अथवा टी20 असो, सर्वच प्रकारात सरस आहे आणि त्याला मिळालेल्या यशाने त्याच्या जिंकण्याच्या मानसिकतेलाही खासकरून अधोरेखित केले जाते. मुख्यत्वे 25-34 (48.9%) या वयोगटात त्याला जास्त पसंती मिळाली तर (29.4%) वयोगटात सर्वात कमी पसंती दिसून आली. त्याचा सर्वात जास्त चाहता वर्ग महाराष्ट्र(12.9%), त्यानंतर कर्नाटक (9%), उत्तर प्रदेश(9%), आंध्र प्रदेश(8.6%), बिहार (8.2%) आणि तेलंगणात (7.3%) आहे असे दिसून आले.
महेंद्र सिंग धोनी हा फक्त खेळाडू नाही तर एका क्रिकेटच्या पिढीच प्रतिक आहे. थाला (नेता) म्हटले की शांत चित्त, खेळातील चातुर्य, उत्कृष्ट नेतृत्व आणि सामन्यांचा अविस्मरणीय शेवट या गोष्टी समोर येतात. एम. एस. धोनी भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम कर्णधार मानला जातो. त्याच्या नेतृत्वात भारतीय संघ आणि Chennai Super Kings यांनी अनेक चषक जिंकले आहेत. सामन्यांच्या महत्त्वाच्या क्षणांना षटकार मारण्याच्या त्याच्या हातोटी मुळे त्याला महान फिनिशर म्हणून गणले जाते. या वेळी IPL मधील शेवटचा सहभाग मानला जात असल्याने प्रत्येक वेळी तो मैदानात उतरेल तेंव्हा भावना उत्कट असणार आहेत. त्याला दोन वयोगटातून सर्वात जास्त पसंती मिळाल्याचे दिसून आले: वयोगट 25-34 (45.25%) and वयोगट 20-24 (35.75%). धोनीचा चाहता वर्ग आंध्र प्रदेश (16%) मध्ये जास्त असून उत्तर प्रदेश(11.8%) आणि तेलंगणा (10.9%) मध्ये त्याला विराट कोहली पेक्षा थोडी जास्त पसंती आहे.
Sunrisers Hyderabad चा आक्रमक फलंदाज अभिषेक शर्मा हा तडाखेबाज फलंदाजीचा नवा अध्याय आहे ज्याला 10% पेक्षा अधिक मत मिळाली. चाहत्यांना तो भारतीय क्रिकेटचे भविष्य वाटतो. तांत्रिक दृष्टीने सक्षम असताना सातत्याने आक्रमक खेळाची हातोटी आणि सातत्य पूर्ण कामगिरी ही त्याला मिळालेल्या पसंतीची मुख्य कारणे आहेत. चाहते तो फंजदाजीला येऊन आक्रमक आणि धडाकेबाज फलंदाजीने प्रतिस्पर्ध्याची दाणादाण कशी उडवतो याची वाट बघत असतात. प्रतिस्पर्ध्याला पहिल्या चेंडूपासून दबावाखाली टाकणारा सलामीवीर म्हणून शर्माची ख्याती आहे. तरूण, बिनधास्त अशा अभिषेकची कामगिरी आधीच सध्या सर्वोत्तम असलेल्या क्रिकेटपटूंच्या तोडीची आहे त्यामुळे हा आयपीएल चा सिझन त्याच्यासाठी ब्रेक थ्रूचा ठरू शकतो.
आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्याची कामगिरी लक्षवेधी ठरत असून अलीकडे इंग्लंड विरूद्ध त्याने केलेली 54 चेंडूतील 135 धावांची खेळी भारताच्या T20 इतिहासातील सर्वोत्तम आहे. अभिषेकचा सर्वात मोठा चाहता वर्ग या 25-34 (57.8%) वयोगटात आहे. बरोबरीने 45-59 या वयोगटात त्याचे 2.5% इतके चाहते आहेत जे काहीसे आश्चर्यकारक आहे. अभिषेकचे सर्वात जास्त चाहते तेलंगणा(13.7%), महाराष्ट्र(12%) आणि आंध्र प्रदेशात(10.6%) आहेत.
या यादीत 4% इतक्या थोड्या फरकाने जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पंड्या (दोघेही Mumbai Indians) आणि यशस्वी जयस्वाल Rajasthan Royals यांचा क्रमांक लागतो.
जसप्रीत बुमराह हा फक्त आघाडीचा गोलंदाजच नाही तर एक लिव्हिंग लिजिंड आहे ज्याने आधुनिक खेळाची परिभाषाच बदलली आहे. चाहत्यांना त्याची अचूक गोलंदाजी, न डगमगणार व्यक्तिमत्व आणि सामन्याची दिशा बदलण्याची क्षमता हे गुण आवडतात. त्याचे फलंदाजांना अडखळणारे धारधार यॉर्कर्स, शेवटच्या षटकांमध्ये असलेली हुकुमत आणि सातत्य यामुळे तो भारताच्या जलदगती गोलंदाजीचा हुकुमाचा एक्का बनला आहे. 25-34 वयोगटात बुमराहला 63% पसंती मिळाली तर त्याचा चाहता वर्ग कर्नाटक(12%), महाराष्ट्र (11%), उत्तर प्रदेश (11%) आणि पश्चिम बंगाल(9.2%) मध्ये आहे.
सहभागींनी अष्टपैलू हार्दिक पांड्याची कौशल्य आणि अष्टपैलू गुणांमुळे निवड केली. सामन्याला कलाटणी देणारा खेळाडू असून फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही बाबतीत तो संघाचा तारणहार ठरू शकतो. 2025 मध्ये आपण सर्वोत्तम आहोत हे सिद्ध करण्याची त्याला पुन्हा एकदा संधी आहे. त्याला 60% इतकी सर्वाधिक पसंती या 25-34 वटोगटात मिळाली. त्याचा सर्वात जास्त चाहता वर्ग उत्तर प्रदेश (14.5%), आंध्र प्रदेश (12.7%), पश्चिम बंगाल (12.7%), महाराष्ट्र (10%), आणि राजस्थान (10%) मध्ये आहे.
यशस्वी जयस्वाल हा नवीन पिढीचा प्रतिनिधी आहे जो शिस्त, शैलीदार आक्रमक फलंदाजी आणि परिस्थितीशी जुळवून घ्यायची क्षमता यासाठी ओळखला जातो. तो भारतीय क्रिकेटची भविष्यात धुरा सांभाळेल असे चाहत्यांना वाटते. त्याची IPL 2025 मधील कामगिरी अनेक प्रकारे त्याच्यासाठी निर्णायकही ठरू शकते. आंध्र प्रदेश (20%), नंतर राजस्थान (15%) आणि उत्तर प्रदेश (15%) इथे तो लोकप्रिय आहे तर त्याचा सर्वात मोठा चाहता वर्ग 25-34 (52.7%) या वयोगटात आहे.
Delhi Capitals मधून Lucknow Super Giants कडे जाऊन सुद्धा रूषभ पंतने 3% पसंती सहित आठवे स्थान मिळवले आहे. तर त्याच्या उलट प्रवास करत या सिझनला Lucknow Super Giants ऐवजी यावेळी Delhi Capitals कडे गेलेल्या के. एल. राहुलला 2.5% मतांसहित त्याच्या पाठोपाठचे स्थान मिळाले आहे.
जीवघेण्या अपघातानंतर ऋषभ पंतने फक्त मैदानातच यशस्वी पुनरागमन केलेले नाही तर इतर ठिकाणीही त्याचा प्रभाव दिसून येत आहे. गेल्या लिलावात Lucknow Super Giants नी 27 कोटींना त्याला प्राप्त केल्यावर तो IPLच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. नवीन कर्णधार म्हणून त्याच्या समोर असलेल्या आव्हानाला कसा सामोरा जातो याची चाहत्यांना उत्सुकता आहे. पंतला सर्वात जास्त पसंती पश्चिम बंगाल (12%) मध्ये मिळाली आहे आणि त्याचा मोठा चाहता वर्ग 25-34(60%) या वयोगटात आहे.
के.एल. राहूल हा तांत्रिक दृष्ट्या सक्षम असा शैलीदार फलंदाज आहे. तो त्याच्या नाजूक आणि शैलीदार फटकेबाजीसाठी ओळखला जातो. दबावाच्या परिस्थितीत सुद्धा त्याचे धिरोदत्त व्यक्तिमत्व चाहत्यांना भावते आणि त्यांना असे वाटत आहे की नवीन संघात गेल्याने त्याच्या क्षमतेला न्याय मिळू शकेल. राहूल 25-34 (43.5%) आणि 20-24 (24%) या वयोगटांमध्ये लोकप्रिय आहे आणि इतर खेळाडूंच्या उलट त्याला 45-59 या वयोगटातून सर्वाधिक 4.4% पसंती मिळाली आहे.
त्यानंतर ज्या खेळाडूंना प्रतिसादकर्त्यांकडून जवळजवळ समान पाठिंबा मिळाला ते म्हणजे 1xBet ब्रँड अॅम्बेसेडर हेनरिक क्लासेन (Sunrisers Hyderabad) आणि सूर्यकुमार यादव (Mumbai Indians) हे प्रत्येकी 2.4% मते मिळवून होते, तसेच संजू सॅमसन (Rajasthan Royals) आणि शुभमन गिल (Gujarat Titans) हे खेळाडू होते, ज्यांना प्रत्येकी 2.3% मते मिळाली. या चार खेळाडूंमध्ये दक्षिण आफ्रिकेचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू हेंन्रिक क्लासेनची खास दखल घ्यायला हवी. IPL बरोबरच क्लासेन आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत इतर लोकप्रिय लीग्स मध्ये खेळला आहे ज्यात एSA20(Durban's Super Giants), Caribbean Premier League (Guyana Amazon Warriors) आणि Major League Cricket (Seattle Orcas) यांचा समावेश होतो. दक्षिण आफ्रिकेच्या संघाबरोबर त्याने पुरूषांच्या टी20 विश्वचषक 2024 मध्ये रौप्य अर्थात उपजेतेपद मिळवले होते.
अलीकडच्या काळात हेंन्रिक क्लासेन हा सगळ्यात धोकादयक आक्रमक फलंदाज म्हणून गणला जातो ज्याची फटकेबाजी सामन्याची दिशा सहज बदलू शकते. फिरकी गोलंदाजी खेळण्यात तो तरबेज असून कितीही विविधता असलेल्या फिरकी गोलंदाजीला तो सहज हाताळू शकतो. बरोबरीने संघाची जबाबदारी घेऊन तो संघाला संकटातून बाहेर काढण्यासाठीही प्रसिद्ध आहे ज्यातून त्याचे कुशल नेतृत्व गुण अनेक वेळा दिसून आले आहेत. त्याच्या या गुणांना चाहते आणि आंतरराष्ट्रीय ब्रॅंड 1xBet दाद देतात आणि म्हणूनच 1xBet ने त्याला आपला ब्रॅंड अॅंंबॅसिडर म्हणून नियुक्त केले आहे.
चाहत्यांची सर्वात जास्त पसंती असलेले आयपीएल 2025 चे पाच अव्वल संघ-
1xBet च्या अभ्यासात खेळाडूंबरोबरच सहभागींनी ते ज्या पाच संघांना उत्साहाने पाठिंबा देणार आहेत त्यांचीही निवड केली:
- Royal Challengers Bengaluru (28,5%)
- Mumbai Indians (21,6%)
- Chennai Super Kings (20,4%)
- Sunrisers Hyderabad (10,3%)
- Kolkata Knight Riders (6,4%)
आधुनिक भारतीय क्रिकेटचा तारा असलेल्या विराट कोहलीचा समावेश असलेला Royal Challengers Bengaluru संघ यात सर्वात जास्त पसंतीसहित आघाडीवर आहे. संघ गेल्या पाच वर्षात चार वेळा प्लेऑफ्स मध्ये पोहचला आहे आणि चाहत्यांना अशी अपेक्षा आहे की या सिझनला ते पहिल्यांदा आयपीएल जिंकतील. आरसीबीकडे सर्वात मोठा चाहता वर्ग आहे आणि त्यांना तेवढाच भक्कम पाठिंबा घरच्या मैदानातही आहे. हा संघ प्रचंड लोकप्रिय असून लाखोंच्या भावना त्यात गुंतलेल्या आहेत.
पाच वेळचे IPL विजेते मुंबई इंडियन्स दुसर्या स्थानावर राहिले ज्यांना 21.6% एवढी पसंती मिळाली आणि महान रोहित शर्माच्या सहित त्यांचे चार खेळाडू सर्वात लोकप्रिय खेळाडूंच्या क्रमवारीत समाविष्ट आहेत. त्यामुळे संघाची लोकप्रियता अपेक्षित होती. भक्कम संघ आणि अचूक डावपेच, त्याबरोबरच अनेक महान खेळाडूंचा संघासाठी खेळण्याचा इतिहास ह्या गोष्टी चाहत्यांना भावतात आणि त्यांना सहाव्यांदा संघ विजेतेपद जिंकेल अशी दाट शक्यता वाटत आहे.
महेंद्र सिंग धोनी समाविष्ट असलेला Chennai Super Kings (20.4%) हा तिसरा आघाडीचा संघ आहे. गेल्या चार IPL मध्ये संघाने स्पर्धा दोन वेळा जिंकली आहे आणि या वर्षी सुद्धा ते जेतेपदसाठी दावेदार आहेत. सातत्याने सकारात्मक निकाल, जिंकण्याची मानसिकता आणि तरूण खेळाडूंना संधी गोष्टी चाहत्यांना भावल्याचे दिसून आले. तरीही थाला अर्थात महेंद्र सिंग धोनीची जादू त्यांच्या लोकप्रियतेचे मुख्य कारण आहे कारण त्याचा समर्पित असा चाहता वर्ग आहे.
10.3% पसंती सहित गेल्या वर्षी अगदी थोडक्यासाठी अंतिम फेरीत पराभव होऊन तिसर्या विजेतेपदापासून दूर राहिलेले Sunrisers Hyderabad आहेत. चाहात्यांना कर्णधार पॅट क्युमिन्स, युवा खेळाडू आणि अनुभवी खेळाडू यांचा समतोल, खेळाची आक्रमक शैली आणि विचारपूर्वक असलेले डावपेच यामुळे संघ IPL 2025च्या जेतेपदसाठी दावेदार आहेत.
Kolkata Knight Riders या गतवेळच्या विजेत्यांबरोबर या पाच आघाडीच्या संघांची यादी समाप्त होते. त्यांचा भक्कम संघ, सुस्पष्ट डावपेच आणि चाहत्यांचा अविरत पाठिंबा ह्या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. संघाचा मालक आणि बॉलिवूडचा किंग शाहरूख खानने आपले सर्व काही नाईट रायडर्स मध्ये लावले आहे जे स्टॅंड्स आणि समाज माध्यमांवर चाहत्यांच्या प्रेमातून दिसून आले आहे.
आयपीएलचे 3 सर्वात लक्षवेधी सामने-
Royal Challengers Bengaluru आणि Chennai Super Kings यांचे समर्थक IPLच्या नव्या सिझनची अतुरतेने वाट बघत आहेत असे या अभ्यासातून दिसून आले. या दोन संघातील लढतीची, खास करून जर अंतिम फेरीत लढत झाली तर त्याचे सर्वात जास्त औत्सुक्य असल्याचे 27.5% सहभागींमध्ये दिसून आले. Mumbai Indians चे चाहते फार मागे नाहीत जे 20% मतांसहीत दुसर्या स्थानावर आहेत आणि 6.87% मतांसहीत तिसर्या स्थानावर असलेल्या Chennai Super Kings यांच्यातील लढतीची मुंबईच्या चाहत्यांना उत्सुकता आहे तर चेन्नईच्या चाहत्यांना Mumbai Indians आणि Royal Challengers Bengaluru यांच्या विरद्ध लढतीबाबत प्रचंड उत्सुकता आहे.
1xBet बाबत-
ही जागतिक स्तरावर नामांकित बूकमेकर आहे ज्यांना सट्टा उद्योगात 17 वर्षांचा अनुभव आहे. ब्रॅंडचे वापरकर्ते हजारो क्रीडा स्पर्धांवर कंपनीच्या 70 भाषात उपलब्ध वेबसाईट आणि अॅपद्वारे सट्टा लावू शकतात. कंपनीच्या अधिकृत पार्टनर्स मध्ये FC Barcelona, Paris Saint-Germain, LOSC Lille, La Liga, Serie A, आणि इतर अनेक नामांकित स्पॉर्ट्स ब्रॅंड्स आणि संघटनांचा समावेश आहे. कंपनीच्या भारतातील ब्रॅंड अॅंबॅसिडर्स मध्ये सुरेश रैना, शिखर धवन, हेंन्रिक क्सालेन आणि अभिनेत्री उर्वशी रौतेला यांचा समावेश आहे. कंपनीला IGA, SBC, G2E Asia, आणि EGR अशा नामांकित आणि प्रतिष्ठेच्या पुरस्कारांचे नामांकन मिळाले आहे आणि पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.